धम्ममार्गाने जाऊया …!
आज काही बौद्धवस्तीत डोकावून पाहिले की, सद्धम्माचे पालन नाही. विहारात जाण्यासाठी कुणाजवळ वेळ नाही. महिलांना टीव्ही सिरीयल पासून फुरसत नाही. बौद्ध संस्कृती अर्थात भारतीय शालीन संस्कृती आपल्या पायाखाली तुडवित फॅशनेबल युगाने झपाटलेल्या तरुणी ज्येष्ठांचा मान राखीत नाहीत.क्रिकेट, मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीपासून कोणता तरुण अलिप्त असेल, असे वाटत नाही. लहान मुलांवर धम्माचे संस्कार नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, अभ्यासाची आवड दिसत नाही. दारुवाल्यापासून त्रस्त नसेल असे गाव शोधूनही सापडणार नाही. नशेच्या आहारी जात असलेल्या तरुणाईला कोणी आवरायला मागत नाही. कोणी कोणाचा गुरू नाही, कोणाचा चेला नाही.वस्तीवर अंकुश ठेवणारे नेतृत्व दृष्टीस पडत नाही. परिणामी गावात एकीकरण नाही. बाप-लेकात मेळ नाही. भावा-भावात पटत नाही. माय-लेकीत बनत नाही, सून-सासचे ऐकत नाही, सासूही आपल्या वजनाने राहत नाही. पती-पत्नीत समन्वय न...