उर्मिला गझल संग्रह परिचय
गझल मंथन समुहाच्या सतत गझल कार्यशाळा घेणाऱ्या, ज्या सध्या त्यांच्या १९ व्या कार्यशाळेत गझलकार व गझलकारा तयार करत आहेत, त्या आदरणीय गुरूवर्या, आमच्या आ. माई, म्हणजेच उर्मिला बांदिवडेकर ह्या होय. त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला गझल संगह उर्मिला गझल संग्रहाविषयी लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे.'उर्मिला' हा आ.माईंचा पहिला वहिला गझल संग्रह. उर्मिला नावाप्रमाणेच त्यांचा त्याग, निःस्वार्थी साहित्याची सेवा, तसेच ह्या वयात ही तरुणाईला लाजवेल असा गझल शिकवण्याचा गोडवा व उत्साह बघून तोंडात बोटे घालावी लागतात. "गझलकार/गझलकारा घडवणे हा त्यांचा गुण, आणि 'गझल मंथन' हा एक मोठा परिवार. "गझल मंथन हा वृक्षच मुळात माईंच्या रुपानं अनेकांचा आधारवड ठरलाय", असे त्यांच्याच कार्यशाळेत घडलेले गझलकार विष्णू जोंधळेसर म्हणतात, ते अगदी खरेच आहे.माईच्या उर्मिला गझल संग्रहात एकूण एकशे एक गझला विविध रंग, ढंग, कला कौशल...