Tuesday, November 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!
News

टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!

टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘टप्पू’ आणि ‘बबिता’ म्हणजेच भव्य गांधी आणि मुनमुन दत्ता यांचा गुपचूप साखरपुडा झाला का? इंस्टाग्राम, यूट्यूब आणि X (पूर्वीचं ट्विटर) वर फोटो, रील्स, हेडलाईन्सचा पूर आला होता. लोकांचं कुतूहल वाढत होतं, काही जण या नात्याचं स्वागत करत होते, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. पण अखेर या अफवांवर स्वतः ‘टप्पू’ उर्फ भव्य गांधीनेच विराम दिला आहे.“मीही त्या बातम्या वाचून चकित झालो!” भव्य म्हणतो, “पहिली गोष्ट म्हणजे, ज्या टप्पूचा साखरपुडा झाल्याचं लोक म्हणतायत, तो मी नाही. दुसरी म्हणजे, ही अफवा बडोद्यातून पसरली. आईला अचानक फोन आला ‘अरे, तुमच्या मुलाचा साखरपुडा झाला का?’ ती एवढी चिडली की तिनेच विचारलं, ‘तुम्हाला अक्कल आहे का?’ हे सगळं...
सटवाई.!
Poem

सटवाई.!

सटवाई.!तू करत जाय मरमर,गायत जाय घामगुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।पायटीच उठूनसन्या करतं झोपीचं खोबरंनशीबात हरदमच हाये तुया वखरंसूर्यदेव ओकते आग तरी काढतं तू काकरंडोयामंधी घिवूनसन्या बायको अन लेकरं….राबराब राबून राज्या कितीक करशीन काम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।सोयाबुन पेर,तूर पेर, नाईतं पेर सरकीकव्हातरी पडते काय तुया हाती दिडकी?बजारात जाताखेपी दलाल तूले हेरतेतभाव कसा पाडता यिन याचाच ईचार करतेदाम तुया हिस्याचे थेच घिवून पयतेतभोयाभाया सभाव तुया तू करतं राम राम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।मार्केटात माल तुया उघळ्यावर रायतेफिकर तुया मालाची कोन कव्हा करते?अन्न-धान्य पिकवासाठी कसतं तू कंबरफ्यासीलिटीत मातरं तुयाच ढांग नंबरउपाशी मरतं तव्हाच दिसंन तेयले धाम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।...
काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव
Article

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सवकाकड आरतीचं स्वरूप खुप प्राचिन आहे.या काकड आरतीला नुसते आध्यात्मिक महत्त्व नसून त्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या आरोग्याशी आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात प्राणवायू ओझोन भरपूर प्रमाणात असतो. म्हणून आपले ऋषीमुनी एवढंच नाही तर सम्पूर्ण प्राणीमात्र भल्या पहाटे उठतात.काकडा आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली विनवणी होय.या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भल्या पहाटे आंघोळ संडासंमार्जन, रांगोळया काढून सम्पूर्ण गावातून नामाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात येते ग्रामीण व शहरी भागातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते.ही अनेक वर्षांपासूनची ही प्रथा, पंरपरा आजही जोपासली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष...
डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस
Article

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवसभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला  जातो.डॉ. lबाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधीदलितांचे-वंचितांचे व  समस्त भारतीयांचे उद्धारकर्तेही झाले.बाबासाहेबांनी लिहिलेल्या  संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे.७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्...
निवडणूका पारदर्शक होईल काय?
Article

निवडणूका पारदर्शक होईल काय?

निवडणूका पारदर्शक होईल काय?गेल्या साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आता निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित केला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय वातावरण तापणार आहे यात प्रश्नच नाही बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता प्रभागा अंतर्गत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत मात्र एक प्रश्न यातून निर्माण होतो तो म्हणजे या निवडणुका पारदर्शक होईल काय? कारण मतदार याद्यातील घोळ ,दुबार मतदार चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधक करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.विरोधी पक्षांच्या आरोपांकडे थेट दुर्लक्ष करत निवडणूक आयोग...
भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची कंपाऊंड वॉल धोकादायक; त्वरित काम सुरू करण्याची मागणी
News

भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची कंपाऊंड वॉल धोकादायक; त्वरित काम सुरू करण्याची मागणी

भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची जीर्ण कंपाऊंड वॉल – नागरिकांचा निवेदनाद्वारे निषेधअमरावती (प्रतिनिधी) : भीमनगर परिसरातील नालंदा बुद्ध विहाराच्या कंपाऊंड वॉलची अवस्था अतिशय जीर्ण व जर्जर झाली असून ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी लहान मुले नेहमी खेळत असतात, त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून स्थानिक नागरिकांनी तातडीने भिंतीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात खासदार बळवंत वानखडे यांनी दिनांक 24 मार्च 2025 रोजी महानगरपालिकेला पत्र देऊन भिंतीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्यापही काम सुरू न झाल्याने परिसरातील नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना निवेदन देऊन परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची विनंती करण्यात आली. उपायुक्त वानखडे यांनी तात्काळ निवेदनाची नोंद घेत संबंधित अधिकारी व अ...
भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!
Article

भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!

भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!बदलापूर आणि कोलकाता येथील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला. या घटनांमुळं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यापूर्वीही अशा घटना घडत होत्या. मात्र, सामाजिक स्तरावर त्याची फारशी चर्चा होत नव्हती.महाराष्ट्रात डॉ संपदा मुंडे यांच्या हत्येचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता रविवारी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील विमानतळाजवळ एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे तीन  जणांनीअपहरण करून सामूहिक बलात्कार  केल्याचे  घटनेने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे.पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.मंगळवारी( ३/११/२५)पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर आरोपी थावसी, कार्तिक आणि कालीस्वरन यांना अटक करण्यात आली. त्यांना पायात गोळ्या घालून रुग्णालयात नेण्यात आले.कोइम्बतूरमधील एका खाजगी महाविद्यालयात शिकणारी ही विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासह कारमध्ये हो...
युनीसेक्स किचन..!
Gerenal

युनीसेक्स किचन..!

युनीसेक्स किचन..    काल संध्याकाळी एका कॅफेत कॉफी प्यायला फ्रेंड्स भेटलो होतो.. कोणाची तरी झोमॅटोची ऑर्डर होती.. तो डिलीव्हरी बॉय दिवसभर डिलीव्हरी करुन इतका थकलेला होता कि त्याने ते पार्सल त्या बॅगेत फेकलं आणि तिथून निघाला.. इतक्या सगळ्या दिवसभराच्या मेहनतीनंतर बिचाऱ्याला किती पैसे मिळत असतील ??.. हाही प्रश्न मनात येउन गेला.. तो तिथून निघून गेला आणि मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिले.. त्यावेळी त्याला भुकही लागली असेल.. घरी त्याचं कुटुंब वाट पहात असेल.. किवा कुटुंब असेल कि नाही माहीत नाही.. फुड तयार करणारा तो कुक त्याची मानसिक/ आर्थिक कंडीशन काय असेल ??.. या सगळ्या प्रश्नानी मन सैरभैर झालं.. आणि इतकं सगळं झाल्यावर रात्री ९ नंतर जेव्हा त्या व्यक्तीच्या पोटात ते अन्न जाईल तेव्हा त्याचं रूपांतर कशात झालेलं असेल ??.. त्या अन्नातून त्याच्या पोटात काय जाईल ??बापरे... म...
जिमनंतरचं अंडं ठरलं जीवघेणं! फिटनेसप्रेमी संदीपच्या अचानक निधनाने खळबळ!
News

जिमनंतरचं अंडं ठरलं जीवघेणं! फिटनेसप्रेमी संदीपच्या अचानक निधनाने खळबळ!

इंदूर : नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवन आणि आरोग्याबद्दल जागरूकता हे सर्व असूनही एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने इंदूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खातीपुरा परिसरातील 32 वर्षीय संदीप या तरुणाचा जिममधून परत आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.मंगळवारी संध्याकाळी संदीप नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने अंडा हाफ फ्राय खाल्लं. त्यानंतर काही क्षणांतच त्याला छातीत दुखायला लागलं, जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आहे.संदीप गेल्या सहा वर्षांपासून नियमित व्यायाम करत होता. फिटनेस आणि आहाराबाबत तो अत्यंत शिस्तप्रिय होता. त्याचा अकाली मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरल...
घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!
Article

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!          आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हे लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुर सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं.         पुर्वीच्या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं होती. पहिलं कारण होतं रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. पुर्वी गावात साथीचे रोग यायचे. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असत. तद्नंतर काळ बदलला व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागला व मरणयोग कमी झाला. दुसरं कारण होतं, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहायचे. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नसायचा व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी...