Thursday, May 28

Article

Article

वसतिगृहाचे जनक छत्रपती शाहु महाराज

       आज कित्येक गरजू आणि हुशार विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेतांना आपण बघत असतो. मी सुद्धा पाच वर्षे समाजकल्याण वसतिगृहात राहून शिक्षण घेतले आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात नंबर न लागल्यामुळे काय त्रास सहन करावा लागतो याची जाणीव झाली आहे. कारण मनात शिक्षण घेण्याची तर तीव्र इच्छा असते पण कुठंतरी परिस्थिती आडवी येते. जे विद्यार्थी वसतीगृहात नंबर लागल्यावर आपले शिक्षण होईल या आशेवर शहरात येतात पण त्यांचा नंबर वसतिगृहात लागला नसेल आणि शिक्षण घेण्याची खुप आवड आहे अश्या विद्यार्थ्यांनी काय करावे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशीच काही परिस्थिती शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर आली होती.कॉलेज, शाळा काढल्या पण काही विद्यार्थ्यांना राहायची सोय नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून १८९६ मध्ये सर्व जातीजमातीसाठी एक वसतिग...
Article

मर्यादा आणि बंधने

भारतीय संस्कृती मधे मर्यादा या शब्दाशी माणसाचे खूप जवळचे नाते आहे. जगतांना प्रत्येकाला काही विशिष्ट गोष्टीच्या मर्यादा पाळाव्या लागतात. त्या कौटूंबिक मर्यादा असो, सामाजिक मर्यादा असो किंवा नैसर्गिक मर्यादा असो! त्या मर्यादा जगण्याचा एक भाग असतो.. मर्यादेत नीतिमूल्ये जोपासली जातात. व्यभिचार, अनिती, स्वैराचार या गोष्टी मर्यादेत राहून च टाळल्या जातात..हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजआपल्या दिनचर्येत संस्कार म्हणून घातलेल्या मर्यादा या निश्चितच बंधन नसतात. बंधने ही लादली जातात तर मर्यादा ही पाळली जाते.. एखाद्या "पक्षाला" जेव्हा आपण पिंजऱ्यात ठेवतो; तेव्हा आपण न उडण्याचे त्याच्या वर बंधन घालतो, पण रात्री अपरात्री मुलांनी घराबाहेर पडू नये हे मुलांना आईवडिलांनी घातलेले बंधन नसून एक काळजी पोटी घातलेली मर्यादायुक्त बंधने असतात..प्रत्येकाला स्वतःचे मत स्वतःची एक स्वतंत्र विचारसरणी असते, पण याचा अर्...
Article

गावकुसाबाहेरचा ‘जीवन संघर्ष’ चावडीवर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न

मानवी उत्क्रांतीचा इतिहास अभ्यास करायचं ठरवलं तर असे लक्षात येईल की, एकेकाळी मानवाच्या दोनंच जाती होत्या. त्या दोन जाती म्हणजे नर आणि मादी. याच दोन जातीचे विस्तारीकरण, वर्गीकरण आणि रुढीकरण झाले आणि बहुजन वंचित अशी एक जात आणि अभिजन संचितांची दुसरी जात निर्माण झाली. या वंचितांना मिळणारी वागणूक आणि करावा लागलेला ‘जीवन संघर्ष’ मोगलांच्या राज्यातही होता. शिवशाहीत कमी होतो आहे असे वाटताना पेशवाईत त्याला उभारी मिळाली. इंग्रजांच्या गुलामगिरीतही वंचितांना हाल-आपेष्टाच भोगाव्या लागल्या. अभिजनांनी इंग्रजी पोषाखासह इंग्रजी खाण्या-पिण्याच्या सवयी आत्मसात केल्या. पण स्वकीयांच्यावर होणारे जातीय अत्याचार बंद केले नाहीत. या गुलामगिरीतून भारत देश 1947 साली मुक्त झाला असे इतिहासकार जरी लिहीत आणि सांगत असले तरी परीस्थिती आज एकविसाव्या शतकातही संपूर्ण बदलली आहे असे म्हणणे आणि मानणे धाडसाचे होईल.गावकुसात राहण...
Article

माझी आई मायेचा सागर..!

आई गेल्यानंतररडून मोकळे  होता आले नाही... वात्सल्याच्या पारंब्या अपरंपार असतात... अजूनही तिचा काळजीवाहू वावर जाणवतो चराचरातूनएक मोठीच पडझड एका अंधार संध्याकाळी दिवे लावणीनंतर आईने डोळे मिटले आईच्या  डोळ्यातला उजेड विझला... उभारी देणारा...माझ्यासाठी मीच पोरका झालो हे पोरकेपण कशानेच झाकत नाही मृत्यू असा निःपात करतो एकाएकी घडते नको ते निसर्गाच्या करुणेचेही गूढ उलगडत नाही !अनेक ठेचा आघात अश्रू काळजीने पोखरलेल्या रात्री कष्टाने थकलेले दिवस श्रांत संध्याकाळी ती शोधत राही दुःखाचा परिहारशेत, नदी आणि  निसर्ग हाच तिचा भाव तिच्या हातातला विळा तणाने वेढलेल्या पिकास धीर देई गांजलेली भूई लख्ख  होई...आठवांचे आभाळ भरुन येते पुनःपुन्हा गाव आणि  वावर तिचा सत्त्यावरचा निःसिम भक्तीभाव जाताना  कुणाही विषयी कसलीही  तक्रार नाही मातीनेच शिकवला होता तिला क्षमाभाव... - सुभाष गडलिंग         वडीलांनी म...
Article

ऊच्चशिक्षितांची निरक्षर माता राधामाय.!

डोंगर पायथ्याशी वसलेलं यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसिलमधलं करजगांव हे गांव. तसं पाहिलं तर सारं करजगावच राधामायचं गणगोत होतं. गावातील प्रत्येक पुरुष तिच्या नात्यात होता. कोणी तिचा बाप, कोणी भाऊ, कोणी काका, कोणी मामा, कोणी दिर, कोणी भासरा, कोणी सासरा, तर कोणी मुलगा होता. आणि असंच नातं तिचं प्रत्येक बाई सोबतही होतं. भिकारी, म्हाताऱ्या बाया, सासुरवाशिणी सूना यांचं हक्काचं आणि मदतीचं ती आश्रयस्थान होती. गावातल्या प्रत्येकाशी तिचे प्रेमाचे आणि फार आपुलकीचे संबंध होते. सारं गाव तिला प्रेमानं राधु म्हणायचे..!   जवळपास साडेपाच फूट उंच, तेवढीच अंगात भरलेली, गौर वर्ण, छान आकर्षक चेहरा, नाकी डोळी छान, कपाळावर भलं मोठं कुंकू, (आजीची ही खास ओळख होती) नऊवारी पातळ (लुगडं) यात ती अधिकच खुलून दिसायची. चौदा पंधरा वर्षाची असतानाच राधाचं कृष्णाजी सोबत लग्न झालं.(राधा-कृष्णा हा योगायोग होता) त्यावेळी तिला फारस...
Article

तरूणाईचा पाऊस..!

आज आकाश गर्द मेघांनी भरुन आलं होतं.आकाशाचा राखडी रंग जाऊन काळाकुट्ट रंग प्राप्त झाला होता.चरावयास गेलेले सारे खग घरट्याच्या ओढीने रॉकेटसमान धावत होते.किलबिलाट करत होते.झाडावर नाचत होते.झाडांच्या रांगेमध्ये नव संगीताचे स्वर छेडत होते . पावसाची चाहूल हे प्रथम पक्षांना व प्राण्यांना कळते म्हणतात ते असू शकते.मी माझ्या बाईकने प्रवास करीत होतो.मेघ दाटून आलेल्या नभातून भूतलावर केव्हा पाऊस पडेल याचा नेम नव्हता ,तसा पाऊस पूर्व सुचना देऊन येत नसतो, पण त्यांची गंधवार्ता सृष्टीतून जाणवू शकते.पाऊस कधीही,केव्हाही,कसाही येते."होत्याचं नव्हतं करतो,नव्हत्याचं होतं करतो."हा पाऊस कवीचा खूप आवडता असतो.पाऊस आणि कविता हे गणित खूप चांगलं जमतं.या पाण्यासाठी बाबासाहेबांनी मोठा संघर्ष केला ."विद्रोहाचे महाड संगर घडून माणवमुक्तीचे महा आंदोलन केले ". पाणी हा जीवनाचा मूल्यवान नैसर्गिक घटक पण यावर  सनातनी मानवाची मक्ते...
Article

अस्वस्थ मनाची घालमेलं….!

"काही व्यक्तींच्या आक्रमणातून राष्ट्र घडत असेल तर ते राष्ट्र हे राष्ट्रीय आदर्शाचे गुलाम ठरते.त्या माणसाच्या स्वप्नात आणि जीवन धारणात बंदिस्त होते.त्याच्या चिरकाल आशा आणि धर्म संकल्पनाच त्यांना देश वाटतात तेव्हा ते स्वतःच्या विश्वासालाच अप्रमाणिक असतात.शब्द आणि कृतीद्वाराही ते एका आत्मसंतुष्ट आणि परिग्रही प्रवृत्तीला पाठींबा देत असतात त्याचा पाठपुरावा करतात."         वॉल्टर लिपमन   मृग नक्षत्राचे काळे काळे मेघ नभात अवतरले होते.मोसमी वाऱ्याची चाहूल खगाना आली होती.नव्या जीवनाला नवे ऊर्जाबल देण्याचे काम मृग करत असतो.सारा प्रदेश गंधवाहानी मोहरून आला होता.पक्ष्यांची मंजूळ रव कर्णाला सुखावणारी वाटत होती .सारे खग स्वच्छंद गगनात विहार करत होते.काळे मेघ दिसताच त्यांनी आपला थव्याला घरट्याकडे वळवले होते.झाडाच्या पानातून नवं संगीताची धून ऐकू येत होती.निसर्गातील बदलत्या काळातील चक्र अविरत चालू आहे.पण म...
Article

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक.…

०६जून १६७४ रोजीचा दिन हा हिंदवी स्वराज्यासाठी सुवर्ण दिन म्हणून ओळखल्या जातो कारण याच दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करून "शिवराज्याभिषेक सोहळा" आयोजित केला होता.शिवराय हे परमपराक्रमी तर होतेच शिवाय त्यांची दूरदृष्टी सुद्धा अतिशय तिक्ष्ण होती.त्यांना माहीत होते की,आपण आपल्या स्वराज्यनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांच्या मोलाच्या योगदानामुळे आपले हिंदवी स्वराज्य जरी निर्माण केले असले तरीपण आपण आजही मोघलांचे मांडलिक म्हणूनच राहणार आहोत.आपल्याला स्वतःचे चलन,राज्यकारभार,न्यायव्यवस्था,करप्रणाली ई.धोरणे ठरविण्याचा स्वतंत्र अधिकार प्राप्त होणार नाही स्वराज्य असून सुद्धा जर आपण प्रजाहित धोरण ठरवू शकत नसलो तर आपल्या हिंदवी स्वराज्याचा काहीच उपयोग होणार नाही.म्हणूनच त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या हिंदवी स्वराज्याची स्वतःची एक ओळख निर्माण होईल आणि आपल्या प्रजेला...
Article

निसर्गाच्या परोपकाराची परतफेड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया.!

निसर्गाने मानवाला भरभरून खूप दिले. एवढेच नाही तर हे सर्व पवित्र व गुणवत्तापूर्वक सुद्धा होते. ह्यामध्ये मानवाला आवश्यक असलेला प्राणवायू, सूर्यप्रकाश, पाणी, खनिज संपत्ती, पक्षी, प्राणी  व वनस्पती आहे. ते सुद्धा विनामूल्य व कुठलेही अपेक्षा न ठेवता जणू मानवावर निसर्गाने परोपकाराचं केले. जणू काही निसर्गाचा जन्मो जन्मीचा  दृढसंबंध असलेले नाते होते. जणू काही निसर्ग मानवावर अतोनात प्रेम करतो. जसे काही निसर्गाने मानवाचे पालकत्व घेतले व त्याप्रमाणे तो मानवाचे पालन पोषण करतो आहे.मानवाची निसर्गही हा खूप काळजी घेतो. त्याची तहान भागली पाहिजे, त्याला प्राणवायू मिळाला पाहिजे. त्याला सूर्यप्रकाशातुन डी जीवनसत्व मिळाले पाहिजे. वनस्पती पासून औषधी मिळाल्या पाहिजे. खाणींमधून खनिजे व समुद्रातून नैसर्गिक साठा मिळाला पाहिजे.मानवाने निसर्गा पासून आता पर्यंत घेण्याचेच काम केले आहे व ही प्रक्रिया अजूनही सुरूच...
Article

बुद्ध लेणींचे नामकरण…!

महाराष्ट्रातील जवळपास 400 बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले आहे.! काहींचे "नामकरण" ही झाले आहे..! भारतीय लोककथेमध्ये 'पांडव' व त्यांच्याशी जोडलेल्या अनेक लोकप्रिय कथा आहेत.! अनेक बुद्ध लेणींचे नामकरण ही याच नावाने झालेले आहे याचा आढावा घेणारा अतुल मुरलीधर भोसेकर यांचा लेख खास वाचकांकरीता देत आहोत.....इतिहासाचा शोध आणि त्याचे पुनर्लेखन का गरजेचे आहे हे लक्षात येईल..!- संपादकज्ञान हे प्रवाही असले पाहिजे, नव्हे तसे ते असतेच. तसेच ते परिवर्तनीय देखील असते. नवनवे संशोधन जसे पुढे येत जाते, तसे जुने ज्ञान किंवा विचार बदलणे अपेक्षित असते. प्रत्येक ज्ञानशाखेत असे प्रवाह निर्माण होत असतात. इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र या शाखेत अविरत संशोधन चालू आहे. मात्र तरीही काही इतिहासप्रेमी, तज्ञ अथवा पुरातत्वविद हे जुन्या शब्दांना किंवा कंसेप्ट्स यांना बदलायला तयार नसतात. मग भले तुमचे संशोधन कितीही ताकदीचे, ...