📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ.सुभाषराव इंगोले यांचे निधन | गरिबांचे डॉक्टर

On: October 20, 2026 12:27 AM
आम्हाला फॉलो करा:
गरिबांचे डॉक्टर डॉ. सुभाषराव बापुरावजी इंगोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली – दारव्हा, यवतमाळ

गरिबांचे डॉक्टर डॉ. सुभाषराव इंगोले यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप!

रुग्णसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड; फुबगाव, खरबीसह दारव्हा परिसरात शोककळा

गणेशराव देशकरी, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

गरिबांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत, रुग्णसेवेलाच आपल्या जीवनाचे ध्येय मानणारे आणि परिसरात ‘गरिबांचे डॉक्टर’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. सुभाषराव बापुरावजी इंगोले (वय ७४) यांचे सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दीर्घ आजाराशी झुंज देत निधन झाले. त्यांच्या निधनाने दारव्हा, फुबगाव, खरबीसह परिसरातील नागरिकांनी एक सेवाभावी वैद्यकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून, त्यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला.

डॉ. इंगोले हे मूळचे फुबगाव (तळेगाव), तालुका दारव्हा येथील रहिवासी होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते दारव्हा येथे स्थायिक झाले; मात्र आपल्या मूळ गावाशी असलेली नाळ त्यांनी अखेरपर्यंत जपली. वैद्यकीय व्यवसाय करताना केवळ अर्थार्जन हा उद्देश न ठेवता, गरजू रुग्णांना मदत करणे आणि त्यांची सेवा करणे यालाच त्यांनी प्राधान्य दिले. जवळपास दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून निरंतर रुग्णसेवा देत होते.

पैशांपेक्षा रुग्णसेवेला महत्त्व

डॉ. सुभाषराव इंगोले यांच्या कार्याची खरी ओळख म्हणजे त्यांची सेवाभावी वृत्ती. रुग्णाकडे पैसे असोत किंवा नसोत, त्याच्यावर उपचार करण्याची त्यांची तत्परता हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत होती. त्यामुळेच पंचक्रोशीत त्यांची ओळख ‘गरिबांचे डॉक्टर’ म्हणून निर्माण झाली होती. उन्हाचा तडाखा असो, पावसाची संततधार असो किंवा कडाक्याची थंडी, दारव्हा येथून फुबगाव आणि खरबी परिसरात जाऊन त्यांनी अनेक वर्षे रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली.

त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, सुस्वभावी आणि आपुलकीचा होता. विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या साधेपणामुळे, सेवाभावी वृत्तीमुळे आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याच्या स्वभावामुळे समाजातील विविध स्तरांतील लोक त्यांचा आदर करीत असत.

शेतीची आवड अन् संघर्षमय जीवनप्रवास

वैद्यकीय व्यवसायाबरोबरच शेती हा त्यांचा आवडीचा विषय होता. मात्र, त्या काळातील पारंपरिक शेतीपद्धती आणि शेतीतून मिळणारे मर्यादित उत्पन्न यामुळे त्यांना आयुष्यात काही काळ आर्थिक संघर्षालाही सामोरे जावे लागले. पुढे मुले मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष काहीसा कमी झाला.

त्यांच्या जीवनप्रवासात संघर्ष, कष्ट, सामाजिक बांधिलकी आणि रुग्णसेवेची निष्ठा यांचा सुंदर संगम होता. माणूस किती वर्षे जगला, यापेक्षा तो समाजासाठी कसा जगला, हे अधिक महत्त्वाचे असते. या विचाराचे प्रत्यंतर डॉ. इंगोले यांच्या जीवनातून येते. त्यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजासाठी दिलेले योगदान आणि असंख्य लोकांच्या मनात निर्माण केलेले स्थान हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी पावती ठरली आहे.

इंगोले परिवारावर दुःखाचा डोंगर

डॉ. सुभाषराव इंगोले यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शालिनीताई, माजी नगरसेवक मुकेश भाऊ इंगोले, मंगेश इंगोले, दोन मुली तसेच त्यांचे बंधू स्व. गणेशराव इंगोले यांच्यासह विस्तृत परिवार आणि मोठा आप्तपरिवार आहे. चिखलीकर परिवाराचे ते आवडते जावई आणि मामाजी म्हणूनही परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, परिचित आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

अंतिम निरोपाच्या वेळी दारव्हा शहरासह तालुक्यातील आणि दूरवरच्या परिसरातील नागरिक, आप्तस्वकीय व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी इंगोले परिवाराचे सांत्वन करून या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना धीर दिला. डॉ. इंगोले यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी विधात्याचरणी प्रार्थना केली.

डॉ. सुभाषराव इंगोले यांचे निधन ही त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरासाठी मोठी हानी आहे. मात्र, त्यांनी जपलेली रुग्णसेवेची परंपरा, गरिबांप्रती असलेली आस्था आणि माणुसकीचा वारसा कायम स्मरणात राहील.

गौरव प्रकाशन न्यूज परिवाराकडून डॉ. सुभाषराव इंगोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र आदरांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात गौरव प्रकाशन न्यूज परिवार सहभागी आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!