📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

‘मेल्या आईचा चहा’ नाटक : शुशांत ठमके यांची समीरची भूमिका | अमरावती

On: October 3, 2026 9:09 AM
आम्हाला फॉलो करा:
‘मेल्या आईचा चहा’ नाटकातील समीरची भूमिका साकारणारे शुशांत ठमके

(मेल्या आईचा चहा नाट्य प्रयोगाच्या निमित्त)

किनवट सारख्या दुर्गम भागात शिक्षणाची गंगा तांड्या पाडयावर नेणारे शिक्षण महर्षी अभियंता प्रशांत ठमके यांचे सुपुत्र शुशांत ठमके हे नाट्य सृष्टीत नावारूपास येत आहेत . त्यांनी चित्रपट तसेच नाटकात अभिनय केला आहे . सखाराम बाइंडर या प्रसिद्ध नाटकात ‘सखाराम ‘ यांची भूमिका त्यांनी उत्कृष्ठपणे केली आहे . त्याच प्रमाणे आता ‘मेल्या आईचा चहा ‘ या नाटकात त्यांनी समीर ची भूमिका केली आहे . तेव्हा समाज मनाला हेलावून टाकणारा हा नाट्यप्रयोग संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन अमरावती येथे ३ आक्टोबर २०१६ ला रात्री ८ . ३० ला होणार आहे . ही अमरावती करांना अंतर्मुख करणारी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे . या नाटयप्रयोगाचे टिकीट बुकिंग सुरु असून, हा नाटयप्रयोग पाहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे .

‘मेल्या आईचा चहा ‘ हे डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित हृदयस्पर्शी नाटक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे सादर होत आहे. यामध्ये यशवंत ( श्रेयस भारसाकळे ) श्रेयसचे वडील सुरेशराव भारसाकळे अमरावती येथीले सुप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळच्या आश्रम शाळे चे निवृत मुख्याध्यापक आहेत . समीर (शुशांत ठमके ), विवेक (धृव ठाकूर ) आदी कलावंतांनी आपल्या समृद्ध अभिनयाने नाटकाची उत्तम परिणामकारकता साधली आहे .

नेपथ्य हे नाटकातील वातावरण निर्मिती प्रभावीपणे सादर करते . यशवंतच्या दिवंगत आई च्या फोटोपुढे दिवा जळत आहे . शोकगंभीर छाया घरभर पसरली आहे . त्या दुःखाला सुतकी शांततेचा गंध आहे. मृत्यूव्यथा ही विदग्ध करणारी असते . कर्करोगाने आईला आलेला मृत्यू हा पिळवटून टाकतो, पण यशवंत त्या दुःखाला मूकपणे सोसतो . तो स्वतःला मुखीर करीत नाही. तो तसा आतून कोसळत असला, दुःखाचे उमाळे तो आतल्या आत गिळून घेतो . दु:खी चेहर्‍याने वावरत नाही . यशवंत समीर आणि विवेक हे शाळकरी मित्र, आपल्या दायीत्वाचा भाग म्हणून त्याची सोबत करतात .

संवादाची भाषा थेट, अस्सल व अनौपचारिक आहे . बोलीचा प्रयोग चपखलपणे केला आहे. संवाद हा चुरचुरीत आणि नर्मविनोदी आहे. कथानका भोवती घटना व पात्रे यांची गुंफण नाटककाराने केली आहे . आईच्या मृत्यूचे कथाबीज लेखकाला गवसले . त्यावर सध्याच्या मानवी नात्याचे बिनचेहर्‍याचे वर्तमान चित्रित करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

मित्रांच्या आणि यातीजनांच्या गर्दीत माणूस दिवसेंदिवस एकाकी पड़तो आहे. त्यामुळे त्याच्या भावनांचा थांग लागत नाही . माणसाच्या मनाच्या तळाशी जाणे अवघड झाले आहे . एक अनोखा मनोव्यापार अव्यक्त ‘स्पेस ‘ मधून डोकावतो . चेहर्‍यावरचे डोळ्यातले आविर्भाव आपल्या अभिनयातून व्यक्त करणे ही खरी नाट्य कला आहे . तीच चित्तवेधक असते . नाटक हे कथा काव्य, संगीत याचा अपूर्व मिलाफ असतो . मराठी रंगभूमी मातब्बर कलावंतानी समृद्ध केली आहे. नवागतांनाही इथे संधी आहे .

यशवंत आईच्या मृत्यूने शोकव्याकुळ झाला आहे . मित्राच्या आईच्या मृत्यूची वार्ता ऐकून समीर त्याच्या घरीयेतो . विवेक आधीच असतो . वयाच्या पंचविशित असलेल्या मुलांची आईविषयी असलेली संवेदना उलगडून दाखविनारे संवाद या नाटकात आले आहे.. यशवंत समीरला प्रश्न करतो . आई म्हणजे काय असते? तेव्हा समीर म्हणतो, जी मुलाला जन्म देते ती आई . जन्म देणे ही केवळ जैविक प्रक्रिया नसून ती भावनिक आणि मानसिक रुपांतरणाची प्रक्रिया आहे . नवजीवनाचा सर्जनशील आविष्कार म्हणजे मातृत्व . मातृत्वच कोणत्याही मातेला वात्सल्याचं अमृत प्रदान करते . जीवन उर्जेच नव रूप तिला हा निसर्ग बहाल करतो . जीवन प्रवाह त्यातून फुलत जातो .

या नाटकातून तीन मित्रांच्या भुतकाळातील आठवणी . त्यांचे स्वभाव . एकमेकांविषयी असलेला मैत्रभाव व्यक्त झाला आहे. एकमेकांच्या काळजीच्या सुरातील संवाद हृदयाला स्पर्श करतात . या लोकप्रिय नाटकात शुशांतला भूमिका मिळाली . त्याला मनस्वी शुभेच्छा . नाट्यसृष्टीत त्याच्या कला अभिनयाचे आविष्करण उमलत राहो . समृद्ध होवो .

  • प्राचार्य सुभाष गडलिंग
    किनवट जि.नांदेड

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now