सिकलसेल एक अनुवंशिक आजार : नियंत्रित करण्यास तरुणांचे सहकार्य अपेक्षित
सिकल सेल या आजाराचा शोध अमेरिकेच्या जेम्स बी हेरीक यांनी 1910 साली लावला. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून पूर्व विदर्भात या आजाराचे लक्षणीय प्रमाण आहे. हा आजार आई-वडिलांपासून मुलांना होतो. आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो. महाराष्ट्रात अनुसुचित जाती आणि जमातीच्या लोकांमध्ये या आजाराचे लक्षणीय प्रमाण आहे. रक्तातील लाल रक्तपेशी गोल आकाराच्या असतात. जेव्हा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबीन मधील ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड येतो, तेव्हा गोलाकार रक्तपेशीचा आकार बदलून वक्राकार किंवा विळ्यासारखा आकार तयार होतो. विळ्यालाच इंग्रजी भाषेत “ सिकल ” असे म्हणतात आणि “सेल“ म्हणजे पेशी त्यामुळे उद्भवणाऱ्या रोगाला “सिकलसेल ” आजार असे म्हणतात.सिकलसेल आजाराच्या विशिष्ट जाती आणि धर्माशी संबंध नाही गर्भधारणेच्या माध्यमातून सिक...