” आरसा गमावलेली माणसं ! “
कवयित्री विद्या जाधव यांचा आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कवयत्री विद्या जाधव या पेशाने शिक्षिका आहे. समाजामध्ये दररोज वेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, अनेक प्रसंग पाहायला मिळतात या सगळ्याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं आहे.समाजाचं, निसर्गाचं,मानवाचं, मानवी संबंधांचे बारकाईने निरीक्षण केले आहे.त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या कवितांमधून पाहायला मिळतं आहे.मानवी जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनामधील अनेक नाती अगदी सोप्या शब्दात त्यांनी उलगडून दाखवली आहेत. समाजातल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून व्यक्त होत आहे. अनेक असणाऱ्या ज्वलंत समस्या आणि त्यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे.मुळातच कवयत्री शिक्षिका असल्यामुळे त्यांचं मन संवेदनशील आहे. या संवेदनशील मनातून अनेक संवेदनशील कवितांची ...
