📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत मोठ्या नियुक्त्या; खुबराम चव्हाण, शशिकांत रोडगे यांची निवड

On: August 10, 2026 9:52 AM
आम्हाला फॉलो करा:
गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत दारव्हा तालुका प्रतिनिधी खुबराम चव्हाण आणि दारव्हा शहर प्रतिनिधी शशिकांत रोडगे यांची नियुक्ती करताना पदाधिकारी.

गणेशराव देशकरी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण सभा ९ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेत वृत्तांकनाचा विस्तार, स्थानिक पातळीवरील बातम्यांचे प्रभावी संकलन आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत श्री. खुबराम चव्हाण यांची दारव्हा तालुका प्रतिनिधी म्हणून, तर श्री. शशिकांत रोडगे यांची दारव्हा शहर प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.

ही निवड गौरव प्रकाशन न्यूजचे मुख्य संपादक बंडूकुमार धवणे आणि यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेशराव देशकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या प्रतिनिधींवर दारव्हा तालुका व शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांचे वस्तुनिष्ठ आणि जबाबदारीने वृत्तांकन करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवरील घडामोडींना व्यापक व्यासपीठ मिळावे, सामान्य नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात तसेच ग्रामीण भागातील महत्त्वाच्या बातम्यांना योग्य प्रसिद्धी मिळावी, या उद्देशाने प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दारव्हा तालुका व शहरात गौरव प्रकाशन न्यूजचे वृत्तांकन अधिक सक्षम करण्यासाठी नव्या प्रतिनिधींच्या नियुक्तीमुळे निश्चितच बळ मिळणार असून, आगामी काळात स्थानिक बातम्यांचे अधिक व्यापक आणि प्रभावी कव्हरेज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवनियुक्त प्रतिनिधी खुबराम चव्हाण आणि शशिकांत रोडगे यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या कार्यासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!