होय, जगातील सर्वांत मोठा न्यायी आणि प्रजाहीत दक्ष राजा म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोकाच…!
आजकाल बऱ्याच राजांना, महाराजांना, सम्राटांना चक्रवर्ती म्हणण्याची प्रथा पडली आहे. मात्र, अशोका हा जगातील खरा खुरा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे आणि खरं चक्रवर्ती पद हे फक्त अशोकाच्याच चरणावर विराजमान होते हे अनेक देशी विदेशी लेखकांनी मान्य केलेल्या पुराव्यावरून सिध्द करता येते. मि. व्हिन्सेंट स्मिथ सारख्या पाश्चात्य इतिहासकार सुध्दा अशोका बद्दल लिहितात की, "His (Asoka's) domination were far more extensive than British India of today, excluding Burma." (Ref.V.Smith's Asoka,3rd edition,Pg.81).अर्थात,आज ब्रिटीश भारत हे नाव ब्रम्हदेश वगळून जेवढ्या प्रदेशांना देण्यात येते, त्याहीपेक्षा जास्त विस्तृत प्रदेश अशोकाच्या सत्तेखाली होता.कारण अफगाणिस्तान व बलुचिस्तान हे ब्रिटीश भारतात मोडत नव्हते, पण अशोकाच्या वेळी ते अशोकाच्याच सार्वभौमत्वाखाली होते. त्यावेळी कॉल, पांड्य, योन, गांधार, पितनिक, आंध्र, कलि...