📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिर

On: September 18, 2025 8:43 PM
आम्हाला फॉलो करा:
धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिर
धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिर
    तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.  येथे दरवर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य असा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.
3
      नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे. नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे (दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे. मंदिरा सभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.
     प्राचीन काळात सहा महिन्याची रात्र व सहा महिन्याचा दिवस असे. राक्षसाकडून होणारा उपद्रव याचा सामना करण्यासाठी तसेच स्वतःच्या रक्षणासाठी ऋषीमुनींनी  शिवजीना आराधना करण्यासाठी एका रात्रीत या मंदिराचं बांधकाम केलं अशी आख्यायिका प्रचलीत आहे. तसेच येथे विठ्ठल रुख्मिणीचा अभिषेक होत असल्याचे शिव भक्तांनी सांगितले.
2
      प्राचीन कालिन महत्त्व असलेल्या या ठिकाणी श्रावण मास,दत्त जयंती, श्री महाशिवरात्री महोत्सव असें तीन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. यात महाशिवरात्री उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. या महोत्सवामध्ये  हजारो शिवभक्त हजेरी लावतात.
1
     प्राचीन कालीन महत्त्व असलेल्या या हेमाडपंथी मंदिराला महाराष्ट्र शासनाचा “क” दर्जा प्राप्त असून सध्या या मंदिराचे व्यवस्थापन नागेश्वर महादेव संस्थान ट्रस्ट धामंत्रीचे अध्यक्ष कैलास कुमार पनपालिया तसेच सर्व विश्वस्त मंडळी पाहतात.
22
-प्रा.डॉ.नरेश इंगळे

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now