📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

On: August 6, 2026 7:01 PM
आम्हाला फॉलो करा:
कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026

राज्यातील लाखो शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या लाभार्थी यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची माहिती दिली आहे.

भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सध्या केवायसी (KYC) पडताळणी आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पुढील दोन-तीन दिवसांत पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली जाईल.

कर्जमाफी योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शासनाकडून प्रक्रिया काळजीपूर्वक राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित काही तांत्रिक बाबी सोडवण्याचे कामही सुरू असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळावे, अशी सरकारची भूमिका असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामाबाबत बोलताना भरणे यांनी राज्यात सुमारे 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती दिली. विदर्भातही बहुतांश भागात पेरण्या पूर्ण झाल्या असून पुढील काळात पुरेशा पावसाची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!