Gadgebaba : गाडगे बाबा आणि आजचे तरुण
सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभलें । करी धरियले गाडगे काठी ॥
डोई शुभ्र केस उडती वाऱ्याने चिंध्या प्रकाशाने चमकती ॥
कीर्तनाचे रंग डुलतो प्रेमाने । भजनानंद म्हणे डेबूजीचा ॥लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रध्देचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते आणि आजही ते आहेत अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय. त्याला आचार विचार त्यांच्या जीवकार्याचा अभ्यास करून ते अमलात आणणे ही आज काळाची गरज आहे, परंतु साधु संत महंतांची चरित्रे आजकालच्या पिढीला टाकावू वाटतात. हातातही धरणार नाहीत कोणी आणि ही गोष्ट उघड आहेत....