जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!
* आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते.
* सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात.
* लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात.
* ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.
* शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते.
* लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते.
* ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे, पोटात वायू होणे, ढेकर येणे अशी ...


