📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

भाड्याची सायकल..!

On: September 17, 2025 8:14 PM
आम्हाला फॉलो करा:

भाड्याची सायकल…!

१९८०-९० चा काळ होता तो…त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो… बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा.
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते…

भाड्याचे नियम कडक असायचे जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी…मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.

भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची…तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं…

स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे…एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली, पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं यातचं अर्धी एनर्जी वाया जायची आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक…खबरदार हात लाऊ नको सायकलला, गुडगे फुटुन येशील…तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो…पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं…असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला..

यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,
नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो…खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे पण आता ते दिवस नाही…तो आनंद नाही….

आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही…

गेले ते दिवस…राहिल्या त्या आठवणी……
असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल. नाही का…?

भाड्याची सायकल* 🚲 १९८०-९० चा काळ होता तो… त्यावेळेस आम्ही …

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now