ह्रदयाची ह्रदयाशी रेंज ना मिळाली…!
माझ्या प्रियाला माझी
प्रीत ना कळाली
ह्रदयाची ह्रदयाशी
रेंज ना मिळाली
पियू उर्फ...कशी आहेस गं तू? मी म्हणणार नाही तू आनंदात असेल म्हणून...कारण मला माहीत आहे तू माझ्याच आठवणीत असते आणि विशेष म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलुंची जाणीव आहे ना मला...हे मी म्हणत नाही, तर तुच म्हणाली होतीस...आणि तुझं म्हणणं अगदी खरं होतं. मी प्रेमच दिलं आहे ना तसं...अगदी अंत:करणातून...यामुळे एवढी तर जाणीव ठेवावीच लागते. मध्यंतरी तुझा एक आर्टिकल आला होता. वाचून खूप आनंद मिळाला की, माझी पियू तर माझ्यापेक्षाही सरस आहे आणि तिचे विचार पण खूप श्रेष्ठ...आणि तेवढंच दु:ख पण...तुला काय वाटलं गं! मला कळणार नाही. म्हणजेच तू दिलेल्या...बद्दल. तू घेतलेला निर्णय तुझ्या परीने कसा होता? हे तर मला माहीत नाही. पण माझ्या परीने...यासंदर्भात मला सांगता येणं खूप म्हणजे खूपच अवघड आहे. तू हा निर्णय का घेतला होता? याचं स्पष्टीकरण ...