शेतकऱ्याची बैलजोडी.!
शेतकऱ्याची बैलजोडी.! चैत्राची गुढी उभारली होती.गुढीपाडवा मोठ्या आनंदानं साजरा झाला होता.आता कास्तकाराचा सण म्हणजे पिका, पाण्या अभावी साधासुधाच, म्हणजे काजयानं डोया साजरा करावा तशीच बुराट गोठ होती.पण शंकऱ्याचं मन कशातच लागत नव्हत. विषयही तसाच गंभीर होता. या बैलजोडीच्या पायी तर त्यानं लगन पाणी,मरणं,धरणं, सगेसोयरे,नातेवाईक सारंच सोडून देलं होतं.शेपाचशे रूपयाची गोठ असती तर वाली गोठ होती. पण इथे तर पन्नासक हजाराचा साजरा झटका होता. कोणता सोयरा,धायरा ही त्याले मदत करण्या इतपत धनसेठ नव्हता. हे आलेलं अस्मानी संकट त्यालेच एकल्याले निस्तारा लागत होतं.ऐन दुष्काळात म्हणजे तेराव्या महिन्यात एवढा मोठ्ठा गड्डा भरणं मोठं जिकरीचंच होतं. बैलजोडी पाई पुरा पागल झालेल्या शंकऱ्यानं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सारी गावं खंगाळून काहाढली होती. रातची त्याची झोप मुश्किल झाली होती. त्याची जोडीही तशी...









