वाघिणीचं दूध
अक्षरापासुन शब्द ,शब्दापासून भाषा यांचा शोध मानवाला लागल्यापासून मानवाने अश्या विस्तृत जनसमुहाच्या सामाजिक जीवनाची धारणा करते तिला भाषा असे म्हटले जाते..
अर्थात भाषा म्हणजे काही शब्दांच संकलन नव्हे .तर काळाच्या भाळावर स्वार होऊन समाजाच्या वैचारीक आणि जाणिवात्मक संचिताला पूढे नेणारी आणि परिवर्तनशील मानवी जीवनाला अखंडता ,आकार आणि आशय प्रदान करणारी एक समर्थ व्यवस्था असते
वाघिणीच दूधहा काव्यसंग्रह समाजाला दिशा देणारा आहे तव्दतच समाजातील समस्यांवर ,आजच्या राजकारणावर झणझणीत अंजन घालणारा आहे
लेखकांनी बालवयापासुनच सामाजिक संघर्ष केला आहे .तसाच लेखकांचा पिंड काव्यत्मक कलाअविष्कार मांडणारा आहे.
राईबाई लेखकांची आई जात्यावर गाणे गात होती .त्यामुळे बालवयात लेखकांना गाण्याची आवड निर्माण झाली .पण गुरू विना शिष्य नाही, या म्हणी नुसार ना,सू ,वसू सरांनी लेखकांचे सुप्त गुण जाणले ,कारण विद्यार्थाचे सुप्त गु...