थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’

‘जयभीम पँथर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. माणूस हा संघटीत होऊन त्यातून एक समाज निर्माण करतो, कारण तो समाजशील प्राणी आहे, पण आजच्या बिघडलेल्या किंवा अस्थिर अश्या सामाजिक परिस्थितीत माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे, किंवा त्यांच्या मनात एक प्रकारचा गोंधळ मुद्दाम काही ठराविक गटाकडून-समूहाकडून निर्माण करण्यात आलेला आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे.

थरारक संघर्षाची दमदार कहाणी 'जयभीम पँथर'

आपण सामाजिक कार्यात सहभाग नोंदवतो किंवा ते कार्य करायचा प्रयत्न करतो, तेंव्हा संघटना अत्यंत महत्वाची भूमिका बजावते, जगातल्या कोणत्याही समाजात संघटना ही अनन्य साधारण कार्य करण्यासाठी निर्माण होते, केली जाते. अश्याच एका संघटनेची गोष्ट या चित्रपटात आहे. पाच बहुजन मित्र एकत्र येऊन एक बहुजन संघटना उभी करतात ती बऱ्यापैकी यशस्वी होते पण पुढे त्याच काय होत किंवा इतर बलाढ्य घटकांकडून काय केल्या जाते हि या चित्रपटाची गोष्ट आहे. हा चित्रपट समाजात येऊन गेलेल्या किंवा आलेल्या सगळ्याच बहुजन संघटनांच कमी अधिक प्रमाणातलं चित्रण आहे. दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा आजवर आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे. आता लवकरच या विषयावर ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून एक वेगळी कथा उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे.

दलित, शोषित बहुजन समाजातील घटकांवर अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या प्रत्येक बहुजन संघटनेची आणि त्यांच्या संघर्षाची सर्वसमावेशक कहाणी ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट मांडणार आहे. जातींमधील संघर्ष, दलितांमधील अत्याचार, बहुजन राजकारण, शिक्षण याचे चित्रण करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक महत्त्व हा चित्रपट अधोरेखित करणार आहे. आजच्या काळात राजकारण बदलत असताना, जातीय संघर्ष वाढत असताना एक वेगळा सर्वसमावेशक विचार देण्याचा प्रयत्न ‘जयभीम पँथर–एक संघर्ष’ हा चित्रपट करत असल्याचं ट्रेलरवरून दिसतं आहे. अनुभवी अभिनेत्यांचा अभिनय, कसदार लेखन दिग्दर्शनांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल यात शंका नाही.!

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

‘जयभीम पँथर’ या चित्रपटात अभिनेता गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटातील ‘माझ्या भीमाची जयंती’ हे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील गीत चांगलेच गाजत आहे.  “जय भीम पँथर” हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर तो संघर्ष, आत्मसन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचा दस्तऐवज आहे. प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा आणि दलित पँथर चळवळीच्या लढ्याची आणि त्यागाची जाणीव ठेवावी.

Leave a comment