📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन

On: January 22, 2026 12:12 PM
आम्हाला फॉलो करा:
लॉंगमार्चची युगयात्रा
लॉंगमार्चची युगयात्रा

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या ऐतिहासिक संघर्षाचे सखोल दस्तऐवजीकरण करणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंदोलन : एक क्रांतीपर्व” हा ग्रंथ प्रा. प्रकाश विश्वनाथ बोरकर यांनी लिहिला असून, गौरव प्रकाशन अमरावती यांनी तो प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता बडनेरा येथील सार्वजनिक कपिल मंडळ सभागृह, अशोक नगर, नवी वस्ती येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान इ. मो. नारनवरे (सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर) राहणार असून, ग्रंथाचे प्रकाशन आयुष्यमान ताराचंद्र खांडेकर (फुले–आंबेडकर चळवळीचे भाष्यकार) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमान विजयकुमार चौरपगार (राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र राज्य), प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे (सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) तसेच आयुष्यमान दिलीपभाऊ एडतकर (संपादक, दैनिक विदर्भ मतदार, अमरावती) उपस्थित राहणार आहेत.

विशेष अतिथी म्हणून आयुष्यमान इंजि. विवेक जनार्दन मवाडे (नांदेड, मराठवाडा), आयुष्यमान कृष्णाजी बोरकर (नागपूर) आणि आयुष्यमती चंदाताई दामू इंगळे-तायडे (मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे.

या ग्रंथप्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, बडनेरा यांच्या वतीने करण्यात आले असून, आयुष्यमान व्ही. एस. मेश्राम (सचिव) व आयुष्यमती पुष्पा बोरकर (कोषाध्यक्ष) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालक, बडनेरा हे संयोजन पाहत आहेत.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील ऐतिहासिक लाँगमार्च, त्यामागील सामाजिक व सांस्कृतिक भूमिका, बहुजन चळवळीचा संघर्ष आणि त्याचे दूरगामी परिणाम यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा हा ग्रंथ संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या ऐतिहासिक ग्रंथप्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!