मतिमंदत्व
शासनाने शिक्षण, हक्क कायदा करून प्रत्येकाला तो अधिकार मिळवून दिला आहे. पण अधिकाराचा लाभ घेण्याची संधी शारीरिक व्यंग असलेल्यांना मिळते का? तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. मूकबधिर व मतिमंद अशा मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या सोयी असतात. परंतु माध्यमिक शिक्षणाची मात्र त्यांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची पाटी कोरीच दिसते. त्यांची बोली भाषा ही सांकेतिक स्वरूपात विकसित झालेली असते. त्यामुळे सामान्य शाळेत शिक्षण घेणे त्यांना कठीण जाते. पदवीच्या शिक्षणाचा पर्याय नसल्यामुळे त्यांना व्यवसायिक शिक्षण घेता येते. पण व्यवसाय शिक्षणातही पाच टक्के आरक्षण आहे.सामान्य मुलांच्या शाळेतले विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु त्यांच्या साठी लागणारे शैक्षणिक साहित्याच्या मर्यादा आहेत. शिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचा विस्तार मर्यादित आहे. कला हा एक विषय त्यांच्या उच्च शिक्षण...