कौटुंबिक न्यायालयातील दिलेत दहा सल्ले !

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
कौटुंबिक न्यायालयातील दिलेले दहा सल्ले !
१) तुमच्या बरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका, उलट, त्यांना नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्या मध्ये जितके अंतर असेल तितके तुमचे नाते चांगले राहील.
२) तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे. हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रीणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो. पण सुनेचे तसे नसते. मुलावर रागवता म्हणून सुनेवर रागावला तर ती कायम लक्षात ठेवते. खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागावू शकते किंवा चुका सुधारू शकते.
३) तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणे ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे. ती तुमची समस्या नाही, कारण आता ती सज्ञान आहे.
४) अगदी तुम्ही एकत्र राहात असला तरी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे सांगा. त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे. अशी कामे करू नका. अगदीच सुनेने विनंती केली आणि ते काम करण्याची तुमची शारीरिक, मानसिक क्षमता असेल तरच ते काम करा. त्या कामाच्या बदल्यात त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलाच्या कौटुंबिक समस्यांची तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या समस्या ते सोडवतील.
५) जेव्हा तुमचा मुलगा आणि सुने दरम्यान वाद, भांडणे चालू असतील तेव्हा आपल्याला काहीच दिसत नसल्याची व ऐकू येत नसल्याची भूमिका घ्या. पती-पत्नीच्या नात्यामध्ये पालकांनी भाग घेऊ नये. असे तरुण दांपत्याला वाटणे स्वाभाविक असते.
६) तुमची नातवंडे ही पूर्णपणे मुलगा आणि त्याच्या पत्नीची असतात. त्यांचे संगोपन कसे करायचे? हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्याचे श्रेय किंवा अपश्रेय त्यांच्या कडेच जाईल.
७) तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमची सेवा केली पाहिजे व आदर बाळगला पाहिजे असा नियम नाही. ते तुमच्या मुलाचे कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक असते. जेणेकरून त्याच्या पत्नी बरोबरील नाते अधिक चांगले राहील.
८) निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे योग्य नियोजन करा, निवृत्ती नंतर मुले सांभाळतील या भरवशावर राहू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि पुढच्या प्रवासात आणखी नव्या गोष्टी शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवा.
९) निवृत्ती नंतरची वर्षे आनंदात घालवणे हे तुमच्या हिताचे असते. जे काही कमावले आहे, साठवून ठेवले आहे त्याचा वापर मृत्यू पूर्वी करणे सगळ्यात चांगले. आपली संपत्ती आपल्यासाठी शून्य होईल असे होऊ देऊ नका.
१०) नातवंडे ही तुमच्या कुटुंबाचा घटक नसतात. ती त्यांच्या आई वडिलां साठीची अनमोल देणगी असते.
हे केवळ तुमच्यासाठी नाही तर हे दहा सल्ले तुमचे मित्र, पालक, नातेवाइकांनाही वाचायला द्या. कौटुंबिक समुपदेशन प्रत्येक आई वडिलांना मार्गदर्शक सुत्रे जज लोकांनी मांडली आहेत. वास्तव त्यांनी जनते पुढे मांडले आहे. व ते अगदी सत्य आहे. प्रत्येक कुटुंबाला जगतांना कसे वागायचे? याचे सुंदर मार्गदर्शन विशद केलय.
आजकाल मुलांना सुनांना त्यांचे स्वातंत्र्य हवं असतं. आणि आई वडील नको असतात. कारण, जो पर्यंत पैसा त्यांचे कडुन अपेक्षित असतो तो पर्यंत गोडवा असतो. आई वडील जेव्हा परिस्थिती ने हतबल असहाय्य होतात तेव्हा, मुलांना नकोसे वाटतात. कारण, त्यांची सेवा करणे, त्यांना स्पेशली, सुनांना जड वाटते. पण हेच तिच्या आई वडिलांना त्रास झाला तर तिच्या डोळ्यात पाणी येते व लगेच त्यांना स्वत: कडे आणायची तयारी होते. हा दुजाभाव नसावा.
आई-वडील सासु-सासरे हे सारखेच असतात, फरक फक्त दृष्टिकोण कसा? यावर अवलंबून असतो. जीवनाच्या नौकेत प्रत्येक व्यक्तीला हा प्रसंग कधीतरी येणारच आहे. म्हणुन आहे तो पर्यंत भरभरून जगावे. आपण आपल्या साठी जगायला शिकायला पाहिजे. हे जीवन नश्वर आहे. कधी बोलवण येईल? सांगता येत नाही.
एक्झीट कॉल आला की, कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सार काही इथेच सोडुन जाव लागते. खाली हाताने माणुस जन्माला येतो आणि जातांना पण खाली हातानेच जातो. मग कसला वृथा अभिमान बाळगायचा? पैसा, अडका, शोहरत, जमीन जुमला, उंची कपडे, गाडी, बंगले, संपत्ती हे एक मृगजळाचा भास राहुन जाते.
अतृप्तपणे सार इथेच सोडुन जावे लागते. याचा पश्चाताप जरुर होतो. पण शेवटी प्रारब्ध हा कुणालाच चुकलेला नाही. म्हणुन ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असु द्यावे समाधान.

Leave a comment