Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा; अभंग सरीता
Article

मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा; अभंग सरीता

मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा, दर्जेदार सामाजिक अविष्काराचा अनुभव संग्रह म्हणजे...'अभंग सरीता'यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील तरनोळी सारख्या छोट्या गावातील माझे मित्र अजय चव्हाण. सह्याद्री कवी एकसंघ यांनी माझ्या कविमित्राला "शब्दसखा" पदवीने सन्मानित केलेले आहे.'अजय चव्हाण' यांचा "अभंग सरीता" हा अभंग संग्रह नुकताच वाचण्यात आला. त्यासाठी हा लेखनप्रपंच!एकुण ऐंशी अभंग रचना समाविष्ट असलेल्या संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यासाठी माझ्या मित्रांचे प्रथम अभिनंदन नि कौतुक!● हे वाचा - भूक छळते तेव्हा... एक संघर्ष गाथामागिल काही काळात काही साहित्यिक ग्रूप मधून मी अजयचे अभंग सातत्याने वाचत आलो आहे. आशयाच्या अगदी खोलात जाऊन संस्कारांची पेरणी करणे,हे अजयच्या लेखणीचे वैशिष्ट्ये. विविध वृत्तपत्रात मासिकात अजय लिहितो....
मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न 
News

मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न 

मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न कुऱ्हा (नितीन पवार)      श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रशांतभाऊ शेलोकार, प्राचार्य डॉ.सुभाष मुरे यांचे मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश शं. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिरादरम्यान,ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, डिजिटल साक्षरता, युवा रोजगार व उद्योजकता,आत्मनिर्भर युवा भारत, कृषी, विकसित भारत सशक्त भारत, भारतीय संविधान इत्यादी विषयाच्या जनजागृतीवर भर दिला आणि श्रमदानातून शेततळे आणि स्मशानभूमीची साफसफाई केली.तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज, गाव गाव संविधान, घर घर...
भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे
News

भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे

 भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळेगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच समता सैनिक दल जिल्हा वर्धा द्वारा आयोजित जागर संविधानाचा अमृत महोत्सव प्रजास्तताकाचा उपक्रमांतर्गत जिल्हा कार्यकर्ता शिबिराचे आयोजन मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कूल रमाई नगर पुलगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात समता सैनिक दलाचा ध्वजारोहन करून करण्यात आली.कार्यक्रचे सूत्र संचालन आयु. मधुरंद नांदेकर सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शशिकांत थुल सर यांनी केले.मुख्य मार्गदर्शक म्हणून आयु. धम्मा कांबळे (समन्वयक कोअर कमेटी समता सैनिक दल भारत) यांनी दलाची भूमिका विस्तृत रूपात मांडताना वर्तमान परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या सन्मानावर होत असलेल्या आक्रमणातून सोडवणूक करून घेण्यासाठी जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा अशा भेदभावापासून स्वतः मुक्त होत देश विभागणाऱ्या विघातक श...
34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
News

34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा

34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावासुनील गुंदैय्यागौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वर जिल्हा अमरावती येथील सन 1990 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 34 वर्षानंतर आपल्या शाळेत एका आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे आयोजन केले. 9 मार्चला मोठ्या उत्साहात मेळावा पार पडला. या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थी एकत्र आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी प्राचार्य श्री. एम. जे. नेरकर सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक श्री.दीपकराव खेरडे सर, मालधुरे सर, पाटील सर, बहातकर सर, गोपाल यावले सर,देवळे सर आणि वडनेरकर सर होते. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे विद्यार्थी प्रमोद घाटोळ, प्रशांत पोहरकर, प्रमोद भगत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा संमेलनातून जिव्हाळा जपला जातोअसे संमेलने होत ...
मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसे
Article

मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसे

मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसेमहाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांचे  अपर मुख्य सचिव असलेले मा. श्री विकास खारगेसाहेब यांचा १७ मार्चला वाढदिवस आहे . श्री विकास खारगेसाहेबांची माझी पहिली भेट ते यवतमाळला जिल्हाधिकारी असताना झाली .आणि तीअजूनही कायम आहे. आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कामाची सुरुवातच बारा मे 2000 रोजी अमरावतीला झाली. या कार्यक्रमाला मा. श्री विकास खारगेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्याचबरोबर आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार  आय आर एस मनपा आयुक्त श्री धनराज खामतकर आय.ए.एस. हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.खारगेसाहेब हे आमच्या अमरावती विभागातील यवतमाळला कलेक्टर होते .दोन हजार साली हॉटेल,विश्राम भवन वगैरे या गोष्टी फारशा प्रचलित नव्हत्या. खारगेसाहेबांचे...
अक्षरमानवच्या अमरावती चित्रपट विभाग प्रमुख पदी आशिष पोल्हाड यांची निवड
News

अक्षरमानवच्या अमरावती चित्रपट विभाग प्रमुख पदी आशिष पोल्हाड यांची निवड

अक्षरमानवच्या अमरावती चित्रपट विभाग प्रमुख पदी आशिष पोल्हाड यांची निवडगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधि) : अक्षर मानव संघटनेच्या चित्रपट विभागाच्या अमरावती जिल्हा प्रमुखपदी आषिश पोल्हाड यांची निवड करण्यात आली आहे.हे वाचा – नाट्यप्रेमी करजगावआजपासून ते या पदाची जबाबदारी स्वीकारतील ही घोषणा अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्षांच्या परवानगीने संघटनेचे राज्य कार्यवाह आझाद खान यांनी केली. त्यांनी आषिश पोल्हाड यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अमरावतीत चित्रपट विभागाला नवी दिशाअक्षर मानव संघटनेच्या विविध विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग म्हणजे चित्रपट विभाग. या विभागाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी निर्मितीला चालना देण्यात येते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आषिश पोल्हाड हे रीफॉरमर इन्स्टिट...
पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू 
Article

पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू 

पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू       विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापासून अव्याहतपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या निर्भय, घणाघाती व चौफेर शब्दाने आणि वाणीने युवकांच्या मनात आपले वेगळे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जैमिनी शारदा कडू उर्फ प्राध्यापक जैमिनी कडू यांचा जन्म व मृत्यू एकाच दिनांकास म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी झाला. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर गढी (तालुका मोर्शी) या गावचे ते रहिवासी असले तरी जैमिनी कडू यांचा जन्म मात्र छत्तीसगडच्या किर्र जंगलातील एका आदिवासी महिलेच्या झोपडीत रात्री अकरा बाराच्या सुमारास झाला. शिक्षक वडील भाऊसाहेब कडू यांना 1942 च्या एका आंदोलनात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीसांकडून अटक होऊ नयेत म्हणून ते छत्तीसगड (म.प्र)  राज्यातील रायगढ गावाजवळील जंगलात भूमिगत झाले होते. त्यां...
धूलिवंदन न खेळता विद्यार्थी करतात १७ वर्षापासून १२ तास अभ्यास
News

धूलिवंदन न खेळता विद्यार्थी करतात १७ वर्षापासून १२ तास अभ्यास

धूलिवंदन न खेळता विद्यार्थी करतात १७ वर्षापासून १२ तास अभ्यासमागील सतरा वर्षापासून धूलिवंदन खेळण्याऐवजी हातात पुस्तक देऊन विद्यार्थ्यांकडून सलग बारा तास अभ्यास करून घेण्याचा आगळावेगळा उपक्रम आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुद्देशीय संस्था राबवत आहे.● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : राज्यासह संपूर्ण भारतात होळी आणि रंगोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. छोट्या बालगोपाळांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रंगात न्हावून निघाले आहेत. पण त्याचबरोबर तरुणाई नशेच्या आहारी जाऊन मोठ्या प्रमाणात मद्यसेवन करताना दिसून येत आहे. शरीरासाठी घातक असलेल्या रंगांची उधळण होत असताना आंबेडकरी तरुणाई यापासून दूर राहावी, या हेतूनं गेल्या सतरा वर्षापासून रंगाऐवजी हातात पुस्तक देऊन त्यांच्याकडून सलग बारा तास अभ्यास करुन घेण्याचा आगळावेगळा उपक्रम आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुद्द...
राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानित
News

राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानित

राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानितगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अहिरे ॲकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. आनंद अहिरे यांनी राज्यस्तरीय  पुरस्कार सोहळा, कवी संमेलन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजन रविवार दिनांक ९ मार्च २०२५  रोजी सकाळी  १० वाजता राणी भवन, नाशिक येथे केले होते याप्रसंगी पुरस्कार सोहळा संपन्न झाला.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!यावेळी प्रमुख पाहुणे  पुस्तकाची आई मा. भिमाबाई जोंधळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. रूपाली पवार, सागर  अडगावकर सन्सचे मालक सागर अडगावकर व  इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.  या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत  महिला दिनी वैद्यकीय, शासकीय, पोलिस, विधी, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ...
फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !
Article

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !चालोरे डायसाणें होळीर...खेला! भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच  वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हाऊस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा  समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डपाच्या आवाजांनी  होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक  रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात.डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा, डफ धीरो......