अक्षरमानवच्या अमरावती चित्रपट विभाग प्रमुख पदी आशिष पोल्हाड यांची निवड
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधि) : अक्षर मानव संघटनेच्या चित्रपट विभागाच्या अमरावती जिल्हा प्रमुखपदी आषिश पोल्हाड यांची निवड करण्यात आली आहे.
आजपासून ते या पदाची जबाबदारी स्वीकारतील ही घोषणा अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्षांच्या परवानगीने संघटनेचे राज्य कार्यवाह आझाद खान यांनी केली. त्यांनी आषिश पोल्हाड यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमरावतीत चित्रपट विभागाला नवी दिशा
अक्षर मानव संघटनेच्या विविध विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग म्हणजे चित्रपट विभाग. या विभागाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी निर्मितीला चालना देण्यात येते.
आषिश पोल्हाड हे रीफॉरमर इन्स्टिट्यूट पुणेचे संचालक असून आतापर्यंत त्यांनी जवळपास १२ हजार विद्यार्थ्याना नोकरी शोधण्यासंदर्भात उत्तम मार्गदर्शन केले आहे. ते कुशल मुलाखत तंत्राचे अभ्यासक आहेत तसेच इंग्रजीवर विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील युवा कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्जनशील विचार असलेल्या व्यक्तींना हक्काचा मंच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.