मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न

कुऱ्हा (नितीन पवार)
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रशांतभाऊ शेलोकार, प्राचार्य डॉ.सुभाष मुरे यांचे मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश शं. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिरादरम्यान,ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, डिजिटल साक्षरता, युवा रोजगार व उद्योजकता,आत्मनिर्भर युवा भारत, कृषी, विकसित भारत सशक्त भारत, भारतीय संविधान इत्यादी विषयाच्या जनजागृतीवर भर दिला आणि श्रमदानातून शेततळे आणि स्मशानभूमीची साफसफाई केली.तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज, गाव गाव संविधान, घर घर संविधान, डिजिटल साक्षरता, डॉ.पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य, विश्वशांतीसाठी राष्ट्रसंतांचे विचार,सॉफ्ट स्किल इत्यादी विषयावर मान्यवराची व्याख्याने झालीत. त्यात प्राचार्य प्रमोद आंबटकर,प्रा.डॉ.संदीप राऊत, प्रा.विशाल मोकाशे, मास्टर ट्रेनर कु.अदिती डहाके, श्री प्रफुल्ल डाफ, प्रा. सुषमा कावळे,श्री पद्माकर शिवरकर यांची अभ्यासपूर्ण अशी व्याख्याने झालीत.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
श्री संत लहानुजी महाराज भजन मंडळ,महिला भजन मंडळ मंगरूळ यांची भजने आणि रासेयो स्वयंसेवक ह भ प सुरज महाराज तिहीले यांचे संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर सुश्राव्य असे किर्तन झाले. त्यासाठी धनंजय निस्ताने आणि चमुनी साथसंगत केली.सांस्कृतिक कार्यक्रमात रासेयो स्वयंसेवक स्वयंसेविका आणि गावकरी महिला यांनी नृत्य, गीत गायन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केलेत.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संस्थेचे विश्वस्त आणि महाविद्यालय विकास समितीचे माजी अध्यक्ष श्री शरदराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रशांतभाऊ शेलोकार, सरपंच सतीश हजारे,श्री संतोषराव नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविक रासेयो गटप्रमुख कु. वैष्णवी गावंडे, अहवाल वाचन कु.वैष्णवी बुराडे तर उपस्थितांचे आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश शं. इंगळे यांनी मानलेत. शिबिर यशस्वीतेकरिता रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे, कु.वैष्णवी गावंडे कु.वैष्णवी बुराडे, समयेक मून, शाहीर शब्बीर शहा, आदेश मांढरे, कु. साक्षी कडू कु.गायत्री गावंडे, अनुप नाईक, शुभम काटकपुरे, मयूर शिवरकर,सुरज तिहीले,कु. ऐश्वर्या मराठे, कु. प्राजक्ता शिदोडकर,कु. ऐश्वर्या शेंडे,कु.समीक्षा चौधरी,कु. साक्षी निस्ताने,कु.पायल शिवरकर,कु.प्राची ठाकरे, कु.निर्जला शिवरकर, कु.सोनाली शिवरकर,संस्कृती कांबळे, आकाश गौरखेडे,मयुरी वानखडे, समीक्षा पचारे,साक्षी ठाकरे विशाल गोहने, प्रियंका मराठे, गौरव राऊत,आचल चावरे,अभिजीत चौधरी,किरण उईके,संदेश वंजारी,संकेत भोंडे यांचे सह सर्व शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, शिबिरार्थी आदींनी परिश्रम घेतले.