34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
सुनील गुंदैय्या
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वर जिल्हा अमरावती येथील सन 1990 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 34 वर्षानंतर आपल्या शाळेत एका आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे आयोजन केले. 9 मार्चला मोठ्या उत्साहात मेळावा पार पडला. या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थी एकत्र आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी प्राचार्य श्री. एम. जे. नेरकर सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक श्री.दीपकराव खेरडे सर, मालधुरे सर, पाटील सर, बहातकर सर, गोपाल यावले सर,देवळे सर आणि वडनेरकर सर होते. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे विद्यार्थी प्रमोद घाटोळ, प्रशांत पोहरकर, प्रमोद भगत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा संमेलनातून जिव्हाळा जपला जातोअसे संमेलने होत राहावे असे प्रतिपादन श्री नेरकर सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले, तर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आमच्या माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे वक्तव्य खेरडे सर, देवळे सर, यावले सरांनी आपल्या भाषणातून केले.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय नागरीकर याने केले. सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला. साहित्य क्षेत्रात असणारे प्रमोद घाटोळ आणि निशा खापरे यांचा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या हस्ते विशेष सत्कार केला. तर महाराष्ट्र पोलीस पदावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री. अनिल निंघोट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विखूरलेल्या मित्रांना एकत्र करून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल श्री. अजय नागरिकर यांचाही सत्कार सर्व विदयार्थ्यांकडून करण्यात आला. सूत्रसंचालन निशा खापरे हिने केले तर राजेश पाटील याने आभार मानले. यानंतर यावले सर आणि देवळे सरांनी गणिताचा तास घेतला आणि पुन्हा वर्ग भरला. सगळ्या विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन अजय नागरीकर, अविनाश बकाले, राजेश पाटील,प्रमोद भगत, प्रमोद घाटोळ, अनिल निंघोट, मनोहर केने, प्रशांत पोहरकर, विलास कटनकर, सुनील कटनकर, आदिनाथ वाकडे,विठ्ठल अर्मळ, गिरीश पोलाड, प्रवीण तिरथकर, यांनी केले. चारुलता भोजने, रंजना देव्हारे, कल्पना वानखडे, माधुरी महल्ले, अरुणा केणे, विजया बोबडे, संगीता राऊत, माला मेश्राम, कुसुम पानझडे, निशा खापरे सह असंख्य मित्र मैत्रिणी उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर एकमेकांना निरोप घेताना पुन्हा भेटूया म्हणून मानस व्यक्त केल्या गेला. सर्वांनी एकमेकांना निरोप देत. कार्यक्रमाची सांगता केली.