राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानित

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानित

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अहिरे ॲकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. आनंद अहिरे यांनी राज्यस्तरीय  पुरस्कार सोहळा, कवी संमेलन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजन रविवार दिनांक ९ मार्च २०२५  रोजी सकाळी  १० वाजता राणी भवन, नाशिक येथे केले होते याप्रसंगी पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

यावेळी प्रमुख पाहुणे  पुस्तकाची आई मा. भिमाबाई जोंधळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. रूपाली पवार, सागर  अडगावकर सन्सचे मालक सागर अडगावकर व  इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.  या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत  महिला दिनी वैद्यकीय, शासकीय, पोलिस, विधी, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, मेडल, व सन्मानपत्र  देऊन गौरविण्यात आले.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

यावेळी डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर यांना राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.  सौ. शुभांगी गादेगावकर यांना राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Leave a comment