भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच समता सैनिक दल जिल्हा वर्धा द्वारा आयोजित जागर संविधानाचा अमृत महोत्सव प्रजास्तताकाचा उपक्रमांतर्गत जिल्हा कार्यकर्ता शिबिराचे आयोजन मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कूल रमाई नगर पुलगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात समता सैनिक दलाचा ध्वजारोहन करून करण्यात आली.कार्यक्रचे सूत्र संचालन आयु. मधुरंद नांदेकर सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शशिकांत थुल सर यांनी केले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून आयु. धम्मा कांबळे (समन्वयक कोअर कमेटी समता सैनिक दल भारत) यांनी दलाची भूमिका विस्तृत रूपात मांडताना वर्तमान परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या सन्मानावर होत असलेल्या आक्रमणातून सोडवणूक करून घेण्यासाठी जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा अशा भेदभावापासून स्वतः मुक्त होत देश विभागणाऱ्या विघातक शक्तींपासून राष्ट्र वाचवताना, धर्म राष्ट्राच्या विरोधात उभे राहताना भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे अध्यक्ष आयु. दिलीप चक्रे सर (वर्धा जिल्हा अध्यक्ष समता सैनिक दल.) हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून आयु. संजय ओरके सर (राष्ट्रीय संघटक समता सैनिक दल भारत.) व आयु. शशिकांत थुल सर (महासचिव समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य) हे होते.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
कार्यक्रमाचे अध्यक्ष आय. दिलीप चक्रे सर यांनी समता सैनिक दल चा पूर्ण जिल्हाभर प्रसार आणि प्रचार कसा करता येईल हे उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेऊन योग्य असे मार्गदर्शन केले. स्मृतिशेष. सखुबाई महादेव ओरके यांच्या स्मृतप्रित्यर्थ आयु. संजय ओरके व आयुष्यमती संगीता ओरके यांचे तर्फे रु. 10000/- चा धनादेश समता सैनिक दलास दान देण्यात आला.
कार्यकमाला आयु. अंबादे सर, आयु. रामटेके सर, आयु. गणवीर सर, आयु. बांगर सर, हे उपस्थित होते. वर्धा, यवतमाळ,आर्वी, पुलगाव, नाचणगाव येथील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. तसेच संडे स्कूल मधील विध्यार्थी व त्यांचे पालकांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमच्या शेवटच्या टप्प्यात. आयु. अरुण विघ्ने सर यांनी लिहिलेल्या मि उजेडाच्या दिशेने निघालो व पिंपळ व्हायचंय मला या दोन कविता संग्रहाचे उपस्थिताना वाटप करण्यात आले. शिबिरामधे उपस्थित असणाऱ्याचे आभार आयु. राजेंद्र गणवीर सर यांनी मानले.