जगातील सर्वात मोठे आणि जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन .!
रेल्वेचे जाळे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. जगातील जास्तीत जास्त देशांच्या आतील राज्य आणि शहरांच्या संपर्कासाठी ट्रेन हा सर्वात चांगला पर्याय मानतात. जगभरात अनेक रेल्वे स्टेशन असे आहेत ज्यांची एक वेगळी ओळख आहे. भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर आहे. तर देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन हावडा जंक्शन आहे. इथे २६ प्लॅटफॉर्म आहेत.
जगातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन अमेरिकेतील एका शहरात आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनवर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजेच हे स्टेशन त्याच्या दोन गुणांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेत असलेले हे स्टेशन १९०३ ते १९१३ या काळात बांधले गेले. या रेल्वे स्टेशनचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.
ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये आहे. ज्या काळात जड यंत्रे नसायची त्या काळात हे सुंदर स्टेशन बांधले गेले. हे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागला होता. या रेल्वे स्टेशनवर एकूण ४४ प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजेच येथे एकाच वेळी एकूण ४४ गाड्या उभ्या राहू शकतात. या स्टेशनवर दररोज सरासरी ६६० मेट्रो उत्तर गाड्या जातात. तसंच १,२५,००० प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे टर्मिनल मध्ये दोन अंडरग्राउंड लेवल्स आहेत. येथे ४१ ट्रॅक वरच्या लेव्हलवर आहेत आणि २६ ट्रॅक खालच्या लेव्हलवर आहेत. हे स्टेशन ४८ एकर जागेवर बांधले आहे.
या स्टेशनवर एक सीक्रेट प्लॅटफॉर्मही आहे. जे स्टेशनच्या शेजारी असलेल्या वॉल्डोर्फ एस्टोरिया हॉटेलच्या खाली आहे. प्रेसिडेंट फ्रँकलिन रुसवेल्ट हॉटेल मधून थेट या सिक्रेट प्लॅटफॉर्मवर व्हीलचेयरने उतरले होते. जेणेकरुन ते जनता आणि मीडियाचा सामना करण्यापासून वाचू शकले होते. दरवर्षी स्टेशनवरुन जवळपास १९ हजार वस्तू हरवतात त्यामधील जवळपास ६० टक्के प्रशासनाद्वारे परत केल्या जातात. अनेक हॉलिवूड फिल्म मध्ये हे सुंदर रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले आहेत. कारण इथे नेहमीच चित्रपटांची शूटिंग होते.
संकलन : मिलिंद पंडित,
कल्याण