पुण्याचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार
पुण्याचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व सध्या पुणे येथे आयकर आयुक्त म्हणून असलेले श्री अभिनय कुंभार यांची भेट झाली व माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. आता अभिनय कुंभार पुण्याला आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांची माझी भेट झाली नसती तर कदाचित आज महाराष्ट्रामध्ये मिशन आय ए एस ची जी चळवळ 36 जिल्ह्यामध्ये उभी राहिली ती कदाचित राहिली नसती. आणि महाराष्ट्राचा आय ए एस चाआकडा 23 वरून शंभर पर्यंत गेला नसता. श्री अभिनय कुंभार हे आज जरी उच्चपदस्थ सनदी अधिकारी असले तरी अमरावतीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते जेव्हा 25 वर्षांपूर्वी आयएएस ही परीक्षा २००० यावर्षी पास झाले तेव्हा ते बसने आले होते. आजकाल तर विद्यार्थी देखील टॅक्सीने फिरतात. ओलाने फिरतात .पण अमरावतीकरांविषयी प्रेम असलेला हा माणूस चक्क बसने अमरावतीला आला आणि विद्यार्थ्यांना मार्गद...









