सोशल मीडियाचा राक्षस.!
सोशल मीडियाचा राक्षस.!झोपायची वेळ झाली म्हणून फेसबुक बंद करून रमाने फोन बाजूला ठेवायची वेळ झाली आणि तितक्यात तिला फेसबुक वर एक मेसेज आला.तो मेसेज तिच्या बरोबर कॉलेजात शिकायला असणाऱ्या एका मित्राचा होता.तशी रमाच्या विवाहाला बरीच वर्ष झाली होती आणि तिची मुले ही विशीची होती.पण फक्त कॉलेज मध्ये सोबत असल्यामुळे त्या मित्राची व तिची ओळख आज ही होती.त्याचा मेसेज होता कि मला तुझ्या इतकी जवळची मैत्रीण कुणीच नाही ग.मेसेज वाचून रमा दचकली आणि आधी तिने आजूबाजूला पाहिले कि नवरा तर आसपास नाहीना.तिने सर्व प्रथम तो मेसेज डिलिट केला.कारण या मित्राचा फ्लरटिंग करण्याचा खरा स्वभाव तिला माहीत होता.तिच्या मनात त्याच्या विषयी काहीच आकर्षण नव्हतं.पण हाच मेसेज जर चुकून तिच्या नवऱ्याने वाचला असता तर तिच्या सुखी संसारात संशय नावाच्या राक्षसाचा प्रवेश कधी झाला असता हे त्या कुटुंबाला कळलेही नसते.कारण असं म्हणतात कि ...









