📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आली बघा तुमची..!

On: October 5, 2025 8:16 PM
आम्हाला फॉलो करा:
आली बघा तुमची…! ( काय असेल नक्की)
 
    …साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महीन्यात व्यायाम करणाऱ्याची संख्या खूपच जास्त दिसते.. ऋतु नुसार व्यायाम करणारे खुप आहेत.. काही जण काही जणाना पहायला म्हणुन व्यायामाला येतात.. मी मात्र आवडीने व्यायाम करते आणि न चुकता करते.. थंडी कमी झाली की व्यायामाला गळती लागते … आज रंगींग ला ग्राउंडवर निघाले तर शेजारुन बोलल्याचा आवाज आला. गोड काकु काकाना म्हणत होत्या आली तुमची… ( ) या कंसात म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय काय विशेषणं आली माहीत नाही.. मी त्यांच्या कडे पाहुन हसले तर काकु जरा गुस्यातच दिसल्या.आजूबाजूला फार कोणी दिसलं नसल्याने त्या मलाच म्हणाल्या हे लक्षात आलं.. काकु शाल पांघरून ग्राउंड कडे निघाल्या  होत्या.. त्यांना पाहिल्यावर मला वाटलं, मी स्लीव्हलेस घालुन आहे आणि यांना थंडी कशी काय वाजतेय..??..
 
      मी गेटमधुन आत गेले आणि रनींग ला सुरुवात केली.. ५-६ राउंड झाल्यावर मी सेल्फी काढत होते.. तोपर्यंत बऱ्यापैकी मंडळी ग्राउंडवर आली होती.. सेल्फी काढुन कठड्यावर बसणार तितक्यात लक्ष गेलं ते त्या काकाकडे..काकु दिसल्या नाहीत म्हणुन मी त्यांना म्हटलं, मघाशी काकु माझ्याबद्दलच बोलत होत्या ना?? त्यावर ते गोड हसुन म्हणाले ,  मी तुला अनेकदा खिडकीतुन पहात असतो.. ते तिने पाहिलय त्यामुळे ती खार खाते.. ती खिडकी बघ तिथे मी रहातो..मी त्या खिडकीकडे पहात असताना राउंड मारुन काकु आल्या आणि काकाना म्हणाल्या ,  चालायचं नाही का ??. की भरलं पोट ??.. माझी हसायची हिम्मतच झाली नाही.. बिचारे काका तिच्यासोबत चालायला लागले आणि मी त्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि स्त्रीच्या मानसिकतेकडे पहात राहिले.. काका एकदम स्लीम फीट , रसिक माणुस वाटला आणि काकु चांगल्याच वजनदार होत्या फक्त शरीरानेच नाही तर आवाजात पण दरारा दिसला.. उठ म्हटलं की  उठ आणि बस म्हटलं की बस समोरच्याने वागावं असा तापट स्वभाव दिसला.. यांना सुन असेल तर तिचं काय होत असेल असाही विचार मनात येवुन गेला..
 
      पण मग माझ्यावर यांचा राग का ??.. मी तर यांना ओळखतही नाही.. आता परत काकाना काही विचारावं तर विचारु तरी कसं ?.. म्हणुन मी पुन्हा चालायला सुरुवात केली तितक्यात काकु एकट्याच गेटमधुन बाहेर गेल्या आणि काका कट्ट्यावर जाऊन बसले.. ते म्हणाले , तुझं नाव काय गं ??.. मी नाव सांगणार इतक्यात तेच म्हणाले ठकी का ??.. की काशी ??.. अहो काका , मी …… अगं तुझ्या काकुने ही तुला ठेवलेली नावं आहेत.. मी इतक्या जोरात हसले आणि काकाना म्हटलं नशीब माझं सटवी किवा अजुन काही म्हणाल्या नाहीत .. त्यावर काका म्हणाले , आमच्या बिल्डींगमधल्या एकीला हे नाव ठेवलय तिने..
 
      माझी हसता हसता पुरेवाट झाली आणि काकाना चेष्टेत म्हटलं , काका म्हणजे तुम्ही सगळ्या स्त्रीयांना पहाता का ?.. अगं काय करु मी वृषभ राशीचा रसिक माणुस आणि आमचा हा ढोल मेषेचा.. मी त्यांना गंमतीत पुन्हा म्हटलं , ढोल नका हो म्हणु .. बरं सुंदरी तुझं नाव काय ?? .. मी म्हटलं , ठकीच म्हणा आणि हो खिडकीत राहु नका रोज उगाच माझं लक्ष व्यायाम सोडुन खिडकीकडे जायचं.. काकांची फिरकी घेत मी तिथुन निघाले , पण  काहीही म्हणा ते काका खूपच गोड होते.. अशा रसिक पुरुषांना अशा बायका देव का देत असावा ?? असा विचार मनात येवुन गेला.. कितीही काहीही केलं तरीही ते बाहेर डोकावणारच.. बायका मात्र स्वतःला व्हीलन बनवुन घेतातआणि विशेष म्हणजे याही वयात नवऱ्याला कोणाकडे पाहु देत नाहीत.. बिचारे पुरूष..
नवरा बायको हे नातं किती गोड आहे ना ..
 
kaka Rocks..
सोनल गोडबोले

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment