प्रिय सखी…!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
प्रिय सखी..
   तुला विटाळ म्हणुन हिणवणाऱ्याच्या पाच दहा द्याव्या वाटतात.. मी तुझ्याशी रोजच बोलते.. तुझ्यावर पुस्तकात लिहीलय.. तुझ्यावर अनेकदा व्हीडीओतुन बोललेय.अनेकदा लेखातुन व्यक्त झालेय..
मुळची मी कोकणातील असल्याने ४ दिवस बाहेर बसायला लागायचं त्यामागे काय कारणं होती माहीत नाही पण स्त्रीला विश्रांती मिळावं हे कारण जरी धरलं तरीही आम्हाला शेतात काम करायला लागायचं त्यामुळे विश्रांती नाहीच पण लहानपणापासून शेतात काम केल्याने शरीराला कामाची आणि व्यायामाची लागलेली सवय आजही तशीच आहे त्यामुळेच तुही सखी न चुकता २७ व्या दिवशी येतेस..
जग इकडचं तिकडे होइल पण तुझी वेळ तु चुकवत नाहीस.. तु माझी प्रिय सखी आहेस आणि मी शरीरावर , खाण्यावर ,वेळा पाळण्यावर झोपण्यावर कुठलेही  अत्याचार होवु देत नाही.. मला मी लावुन घेतलेली शिस्त आहे म्हणुन तुही दरमहिन्याला न चुकता तुझ्या वेळेत मला कुठलाही त्रास न देता मला भेटायला येतेस.. मग मी माझ्या पोटावर म्हणजेच तुझ्या खांद्यावर हात ठेउन खुप गप्पा मारते.. तुही बोलतेस पण ते फक्त आणि फक्त मलाच ऐकु येतं.. सखी मधे कसले गं आभार पण तुझी कृतज्ञता तर व्यक्त करायलाच हवी ना.. तुझ्याइतकं शिस्तबद्ध कोणीच नसेल म्हणुनच तु आलीस की मुलीला म्हटलं जातं , तु आता शहाणी झालीस.
सखी तुझ्यामुळेच आम्ही वेड्याच्या शहाण्या होतो आणि नंतर बेशीस्त वागुन पुन्हा वेड्यासारखं वागतो मग तुही तशीच वागतेस. कधी महीन्याने तर कधी दोन महीन्याने तर कधी अवेळी येतेस.. पण माझ्याकडे येताना तु  कायमच शीस्तीत येतेस आणि तीन दिवसाने निघूनही जातेस.. पण सखी यावेळी थोडी घाबरले होते गं कारण तु तीन दिवस उशीरा आलीस पण यात तुझी चुक नाही गं कारण कदाचित लवकरच तुझी आणि माझी ताटातुट होइल कायमस्वरूपी .. त्याचीच ही नांदी असावी बहुधा.. तुझ्यावाचून मी आणि माझ्यावाचुन तु एकमेकींना सोडुन रहाणं ही कल्पना करुन आताच डोळ्यात पाणी आलय.. पण हा निसर्ग नियम आहे ना सखी.  तुझ्यासकट प्रत्येकाला त्याचं नेमुन दिलेलं काम संपलं की इथुन जावच लागणार.. पण तुझ्यामुळे मी आई झालेय हे कधीही विसरणार नाही..माझ्या मुलीच्या आयुष्यातही अशीच तिची सखी बनुन रहा.. तुला पाहिलं की कायमच खुप आनंद होतो.. मला सोडुन जाताना  कुठल्याही प्रकारचा त्रास होवु न देता  आनंदाने जाशील याची मला मनोमन खात्री आहे..
सखीनो एक सॅल्युट तो बनताही है .. आपल्या आतल्या प्रिय सखीला.. अध्यात्म , विज्ञान यापुढे एक शक्ती असते आणि ती म्हणजेच आपलं इनर फीलींग .. मेनोपॉज च्या आसपास असणाऱ्या प्रत्येकीने आपल्या सखीशी बोला तिची कृतज्ञता व्यक्त करा. आणि जादु पहा..
Law of attraction always does work..
Dedicated to  all my sakhi..
– सोनल सचिन गोडबोले

Leave a comment