असा बाप असल्यावर का नाही मुली मोठं नाव कमावणार?

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
असा बाप असल्यावर का नाही मुली मोठं नाव कमावणार?
                                          पारनेर तालुक्यातील पुरोगामी  विचारसरणी आणि सामाजिक हितासाठी एकत्र येणार गाव म्हणजे ! ” पाणीदार पानोली”.  त्याच गावातील एका ध्येयवेडया बापाने, अक्षरशः गाव सोडून मुलींच्या खेळाकडे “असणारा कल” लक्षात घेऊन त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावा म्हणून पानोली सोडून पुण्यात राहण्याचा धाडसी निर्णय घेतला.  तो धाडसी निर्णय घेणारी  व्यक्ती म्हणजे अंकुशराव गायकवाड .
                नुकतेच  त्यांची कन्या अंकिता हिने पुणे मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला जरी असला तरीही , तिचं ध्येय खूप मोठं आहे. त्या ध्येयाच्या दिशेने उचललेलं हे पहिल पाउल आहे .  हे यश फक्त अंकिता आणि  तिच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसुन ‘ती’ अनेक  नवीन स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अश्या कितीतरी अंकिता आणि अंकुशराव  यांच्यासारख्या ध्येयवेड्या बापलेकीसाठी खूप प्रेरणा दायी आणि बळ देणार आहे.
                             अंकुशराव यांच्याशी मी स्वतः कितीतरी वेळा ह्या विषयावर बोललोय, नक्कीच हा धाडसी निर्णय सोपा नव्हता. आर्थिक बाबतीत होणारी कसरत, अनेक अडचणी. परंतु अंकुशराव हरले नाही जिद्दीने उभे आहेत. त्या जिद्दीला नक्कीच सलाम…!
“प्रवाहासोबत कुणी ही पोहत, परंतु प्रवाहा विरोधात पोहण्यासाठी धमक आणि निडरता हवी ती तुमच्यात नक्की आहे”. कन्येस आणि तुम्हास खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन..!
-अशोक पवार 
8369117148

Leave a comment