📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

CJP ची आज निर्णायक बैठक; अभिजीत दिपके म्हणाले – ‘राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण…’

On: August 5, 2026 12:45 PM
आम्हाला फॉलो करा:
छत्रपती संभाजीनगर येथे CJP बैठकीपूर्वी अभिजीत दिपके माध्यमांशी संवाद साधताना

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टी (CJP) ची महत्त्वाची दोन दिवसीय बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे सुरू झाली आहे. या बैठकीत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत, संघटन विस्ताराबाबत आणि विविध राष्ट्रीय विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती CJP चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी दिली.

या बैठकीसाठी CJP चे अनेक पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून, पक्षाची पुढील दिशा आणि देशभरात संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. झारखंडमधील आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचेही दिपके यांनी स्पष्ट केले. तसेच त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पक्षाचे प्रतिनिधी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारणात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अभिजीत दिपके म्हणाले, “सध्या आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही. मात्र, याबाबत माध्यमांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.” त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत पक्षांतराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली.

याशिवाय मीडिया, न्यायव्यवस्था, बेरोजगारी, E20 धोरण आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाशी संबंधित सोनम वागचूक यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. उद्या दुपारी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील निर्णयांची माहिती दिली जाणार असल्याचे दिपके यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांत विविध आंदोलनांमुळे चर्चेत आलेल्या CJP कडून या बैठकीनंतर कोणते नवे निर्णय घेतले जातात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!