बेरोजगार युवकांच्या हरवलेल्या स्वप्नांचे द्वार खुलणार !
* ३४ विभागातील ९० हजार रिक्त पदांची मेगाभरती
देशाचे उद्याचे भविष्य असणारे युवक नैराश्याच्या गर्ततेत ओढवले जात आहे. प्रत्येक युवकाचं एक स्वप्न असतं. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो. परंतु त्याच्या मेहनतीवर आपले उदासिन सरकार पाणी फेरतं. त्यामुळे तो बदललेल्या मानसिकतेमुळे नको ते कार्य करायला लागतो. याला जबाबदार सर्वस्वी आपली शासनप्रणालीच आहे. कारण मागील ६ वर्षापासून मोठ्या पदभरतीला पूर्णत: पूर्णविराम दिला आहे. यामुळे आपला प्रत्येक युवक बेरोजगारीच्या शृंखलेत जखडला आहे.
सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये २ लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी किंवा निवडणू...