फुकट संस्कृतीच्या…घो..!
१९७२ मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. पाणी होतं, पण लोकांना खायला अन्न नव्हतं. अमेरिकेकडून निकृष्ट गहू व लाल ज्वारी (मिलो) याची. तत्कालिन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांनी प्रथमच कायदा करून तत्कालीन विधानसभा सभापती वि. स. पागे यांनी तयार केलेली रोजगार हमी योजना (रोहयो) विधानसभेत मांडून मागेल त्याला काम यासाठी ‘रोजगार हमी योजना’ कायदा केला. त्या वेळी रोजगार हमीतून रस्ते, तलाव, बंडींग, नाला बंडींग अशी विकासाची अगणित कामे झाली. लोकांना ‘श्रमाच्या’ मोबदल्यात कामाच्या हिशोबाने सरकारने धान्य व पैसे दिले.
सरकारने त्या वेळी मनात आणलं असतं तर आजच्या राज्यकर्त्यांसारखे धान्य व पैसे लोकांना फुकट वाटू शकले असते. परंतु त्यावेळचे राजकारणी धोरणी व व्यवहारी होते. या संकटाचे त्यांनी संधीत रूपांतर केले. भिषण दुष्काळात लोकांना सरकारने जगवीले आणि त्या बदल्यात त्यांनी लोकांकडून विधायक कामे करून घेतली. गेले ते दिवस…आता…घरातील दोन महिला: Rs ३००० प्रतिमहा,
*वार्षिक : ३६,०००
*मुलगा graduate : Rs १०,००० प्रतिमहा,
*वार्षिक :१,२०,०००
*एकुण – १,५६,००० वार्षिक.
*शेतकरी सन्मान निधी तीन स्वतंत्र अकाऊंट करून १८,००० रुपये वार्षिक.
*एकुण – १,५६,००० + १८०००
*= १,७४,०००/वर्ष
*रेशन + आयुष्यमान मोफत
कशाला मजूर मिळतील शेतीसाठी, आणि तरुणाई नेत्यांच्या मागे फिरायला मोकळे.
छोट्या मोठ्या बिझनेस मधे पण कामगार मिळणे अवघड झालं आहे. अशा फुकट संस्कृतीतून व्यसनाधीनता, गुन्हेगारी, सामाजीक व कौटुंबिक समस्या उभ्या ठाकणार आहेत. आर्थसहाय्य करायचेच तर ते अंध, अपंग व निराधारांना करा याला हरकत नाही. पण फुकटे पोसू नका. अर्थसहाय्य, मोफत धान्य द्यायचे तर ते श्रमाच्या मोबदल्यात द्या. ते देखिल दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींनाच. त्यांचेकडून रस्ते, गावतळे, पाझर तलाव, ग्रामस्वच्छता, शहरस्वच्छता, वृक्षारोपण, चाऱ्या-कालव्यांची दुरुस्ती प्रसंगी शेतीतली कामे करुन घ्या. घामाच्या बदल्यात दाम द्या. तात्पुरत्या मोफत मलमपट्टीपेक्षा तरुणाईला कायम स्वारुपी रोजगार द्या, लघुउद्योग उभारणी करा, शेती व जोडधंद्यांचे सक्षमीकरण करा, महिलांना आत्मनिर्भर बनवा, आदिवासी, मागासवर्गीय घटकांना आर्थिक ऊन्नतीकडे न्या. समाजाला लाचार, बनविण्याऐवजी स्वाभिमानी बनवा. क्षणिक मतांच्या बेगमीसाठी जनतेला लाचार बनवू नका.
फुकट संस्कृतीतून लाचारांची फौज उभी राहिल. मतांच्या जोगव्यासाठी समाज, तरुणाई लाचार होणे राजकारण्यांना हवे आहे. पण याचे परिणाम पुढील पिढी कर्तुत्वाने मोठी होणार नाही. बरबाद होईल. व्यसनांनी, गुन्हेगारीने नासून जाईल. हे होवू नये यासाठीच मोफत संस्कृतीच्या ……चा घो! विचार करा, विरोध करा.