प्रिय सखी…!
प्रिय सखी..
तुला विटाळ म्हणुन हिणवणाऱ्याच्या पाच दहा द्याव्या वाटतात.. मी तुझ्याशी रोजच बोलते.. तुझ्यावर पुस्तकात लिहीलय.. तुझ्यावर अनेकदा व्हीडीओतुन बोललेय.अनेकदा लेखातुन व्यक्त झालेय..
मुळची मी कोकणातील असल्याने ४ दिवस बाहेर बसायला लागायचं त्यामागे काय कारणं होती माहीत नाही पण स्त्रीला विश्रांती मिळावं हे कारण जरी धरलं तरीही आम्हाला शेतात काम करायला लागायचं त्यामुळे विश्रांती नाहीच पण लहानपणापासून शेतात काम केल्याने शरीराला कामाची आणि व्यायामाची लागलेली सवय आजही तशीच आहे त्यामुळेच तुही सखी न चुकता २७ व्या दिवशी येतेस..
जग इकडचं तिकडे होइल पण तुझी वेळ तु चुकवत नाहीस.. तु माझी प्रिय सखी आहेस आणि मी शरीरावर , खाण्यावर ,वेळा पाळण्यावर झोपण्यावर कुठलेही अत्याचार होवु देत नाही.. मला मी लावुन घेतलेली शिस्त आहे म्हणुन तुही दरमहिन्याला न चुकता तुझ्या वेळेत मला कुठलाही त्रास न देता मला भेट...









