अमरावतीची सुकन्या आयएएस अधिकारी श्रीमती प्रेरणा हिम्मतराव देशभ्रतार
8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त चवथा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा चवथा लेख.- संपादकअमरावती शहराचा फैजरपुरा किशोर नगर हा भाग. या भागामध्ये सूर्यवंशी नावाचे सेवानिवृत्त तहसीलदार राहतात. ते आता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची नात आणि आपल्या अमरावती शहराची सुकन्या प्रेरणा आता महाराष्ट्रामध्ये आयएएस अधिकारी म्हणून काम करीत आहे. अमरावतीच्या वाट्याला हे वैभव यावे हे खरेच नमूद करण्यासारखे आहे प्रेरणाचे शिक्षण वडील पोलीस अधिकारी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. प्रायमरी व माध्यमिक शिक्षण अमरावती नागपूर आंबेजोगाई बीड नाशिक येथे झाले. वडील तेव्हा उपविभागीय पोलीस अधि...









