Monday, March 9

Article

आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!
Article

आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!

आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!भारतात एका वर्षात विवाह सोहळ्यांवर खर्च होणारी रक्कम ही अनेक देशांच्या जीडीपीच्या वर गेली लग्न कार्याच्या निमित्ताने सग्यासोयऱ्यांच्या गाठीभेटी होतात, सुख-दुःखाचे वार्तालाप होतात, शेतमालाचे भाव, नवीन जाती, राजकारण, समाजकारण असे दहा- पाच वर्षापूर्वी होत असे. अलीकडे लग्न अडीच- तीन तास उशिरा लागतात, मग शुभमुहूर्त व लग्नतिथी आपण का काढतो हेच कळत नाही. ऑर्केस्ट्रा व डी जे (Orchestra and DJ)  च्या प्रभावामुळे कान बहिरे होतात व हृदयाचे ठोके वाढतात, ना कुणासोबत बोलणे ना ख्यालीखुशाली विचारता येत, ना कुठले फोन घेता येत. अलीकडे सर्व समाजात (मारवाडी, ब्राह्मण, गुजराती व सिंधी समाज याला अपवाद आहे.) चोरपावलांनी नकळत काही विकृत्या घुसल्यात. लग्नकार्यादी प्रसंगातील मांगल्य आणि पावित्र्य पार हरवले आहे. हौसेच्या नावाखाली केवळ उधळपट्टी व फक्त प्रदर्शनाने जागा घेतली.एका स...
नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात
Article

नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात

नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मातअपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही माणसे फिनिक्स पक्षाप्रमाणे आयुष्यामध्ये उभी राहतात आणि आपल्या कर्तुत्वाने आपल्या मित्रमंडळीमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात.अशी बरीचशी माणसे आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या मित्रमंडळीमध्ये असाच एक माणूस आहे त्याचे नाव आहे नरेंद्र बोरकर. तो आमचा मित्र तर आहेच पण भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांचा वर्ग मित्र आहे . न्यायमूर्ती श्री भूषण गवई जेव्हा सुरुवातीला अमरावतीला ज्या फ्रेझरपुरा या भागामध्ये राहत होते त्याला लागून असलेल्या किशोरनगरमध्ये श्री नरेंद्र बोरकर यांचे राहणे होते. न्यायमूर्ती श्री भूषण गवई आणि नरेंद्र बोरकर यांनी अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयात डी बी एम हा कोर्स सोबतच केला. श्री गवईसाहेब यांच्याकडे तेव्हा फियाट कार होती. काही वेळा ते श्री बोरकर यांना घ्यायला यायचे व सोबत मिळून...
शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढा
Article

शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढा

शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढाआजच्या काळात शिक्षण हा समाजाच्या उभारणीसाठी सर्वात महत्त्वाचा पाया आहे. पण दुर्दैवाने, शिक्षणाच्या या पवित्र प्रक्रियेचं बाजारीकरण होतंय, आणि याच गोष्टीविरोधात खंडाळा येथे एक परखड, धारदार आवाज उठविला  सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी.*ज्या शाळेने पोसलं, वाढवलं – त्या शाळेचंच विस्मरण का?विजय ढाले यांनी आपल्या भाषणात ज्या मुद्द्यांना स्पर्श केला, ते प्रत्येक सुजाण नागरिकाने आत्मपरीक्षण करत समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या शाळांनी अनेक शिक्षकांचा संसार चालवला. पण तेच शिक्षक निवृत्तीनंतर "कॉन्व्हेंट शाळा" काढून शिक्षणाचा बाजार थाटत आहेत. हे शिक्षक कधीकाळी सरकारी शाळेत शिकवणारे होते. त्यांनी मिळवलेल्या वेतनातूनच आता खाजगी शिक्षणसंस्था उभारू...
आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे – महात्मा ज्योतिराव फुले
Article

आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे – महात्मा ज्योतिराव फुले

आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे - महात्मा ज्योतिराव फुलेज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी कटगुण, सातारा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे चिमणाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते. त्यांचे फुले पुरविण्याचे काम असल्यामुळे त्यांना लोकं फुले म्हणून ओळखू लागले. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. अँटोनिमा ग्राम्सी या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले याना "सेंद्रिय बुद्धिवंत" असे संबोधले होते. त्यांचा शाळेत शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता. ज्योतिराव मुळात एक उद्योगपती होते. ते पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याच्या (बंड गार्डन) पूल बांधण्याचा १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेल...
महात्मा फुले – जागतिक किर्तीचे समाज क्रांतिकारक 
Article

महात्मा फुले – जागतिक किर्तीचे समाज क्रांतिकारक 

महात्मा फुले - जागतिक किर्तीचे समाज क्रांतिकारक महात्मा जोतीराव  फुले हे जागतिक कीर्तीचे समाजक्रांतिकारक,विचारवंत,दार्शनिक,लेखक आणि वयाच्या २१ व्या वर्षी १८४८ साली भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळेची सुरुवात करणारे शिक्षण महर्षि होते. कामगार नेते, स्री-अस्पृश्यता मुक्तीचे प्रणेते, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, उद्योगपती, अभियंता, आद्यमराठी नाटककार, कवी,शाहीर, साहित्यिक, शिवचरित्रकार,इतिहास संशोधक,प्रकाशक,सत्यशोधक समाज व सार्वजनिक सत्यधर्म संस्थापक,सामाजिक क्रांतीचे उद्गाते आणि रागडावर शिवरायांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती साजरी करणारे शिवरायांचे वैचारिक वारसदार...इ. कितीतरी उपाद्या आणि वेगवेगळे विशेषण लावून ज्यांचे कार्य वर्णना करता येईल असे बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच क्रांतिसूर्य महात्मा फुले.त्यांनी जेव्हा शैक्षणिक चळवळ सुरू केली तेव्हा भारतात साक्षरांची संख्या अवघे अडीच टक्के हो...
प्रशासनातील दीपस्तंभ : सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे
Article

प्रशासनातील दीपस्तंभ : सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे

प्रशासनातील दीपस्तंभ : सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढेमा. श्री तुकाराम मुंढेसाहेबांचा हे जेव्हा आयएएस झाले त्या वर्षी  म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी सत्कार केला होता आणि आणि आज  त्यांचे कार्य पाहून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो .मिशन आयएएसचे उद्घाटन सध्याचे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य  सचिव मा.श्री विकास खारगेसाहेब यांनी 12 मे 2000 ला केले .तेव्हापासून तर 25 वर्षापर्यंत  आम्ही दरवर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत आहोत . साधारणपणे  आतापर्यंत  373  आयएएस  आयपीएस  आयएएस  सनदी  व राजपत्रित अधिकारी आमच्या  या उपक्रमात सहभागी झाले आहेत.   श्री तुकाराम मुंढेसाहेब जेव्हा आयएएस झाले .तेव्हा मी सत्कारासाठी यांना फोन लावला .साहेब तेव्हा खूपच व्यस्त होते .पण ते तळमळीने म्हणाले काठोळेसर आज शब्द देत नाही .पण येण्याचा पूर्ण...
शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी
Article

शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी

शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटीयुवा अकादमी फेसाटीकार 'नवनाथ गोरे' यांची 'बंधाटी' ही दुसरी कादंबरी. 'नवनाथ गोरे' यांची लेखणी समकालातील सामाजिक प्रश्न घेऊन उठाव करते. जे जगणे भोगले सामाजिक वास्तव अनुभवले, तेच त्यांच्या लेखणीचे विषय होऊन काळजाच्या काकऱ्यात दबलेले अंकुर शब्द रूपाने तरारून येताना दिसतात.  ग्रामीण जगणे हे समूहाचे जगणे असते. त्यामुळे 'बंधाटी' कादंबरीचा एकच नायक अथवा नायिका नसून यामध्ये अनेक पात्र वेगवेगळ्या भूमिका घेऊन येतात. शेताच्या बांधावरून पेटणारा संघर्ष जमिनीची मोजणी करूनही संपत नाही. हा बांधवरंब्याचा संघर्ष एकमेकांच्या रक्ताचा टिळा लावूनही न संपणारा व पिढ्यानपिढ्या चालणारा आहे. हे प्रखर सामाजिक वास्तव ही कादंबरी मांडते. या संघर्षा बरोबरच ग्रामीण जीवनाला घट्ट वेढून असणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा वेध ही कादंबरी घेते.    गाव म्...
थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’
Article

थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’

थरारक संघर्षाची दमदार कहाणी 'जयभीम पँथर''जयभीम पँथर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. माणूस हा संघटीत होऊन त्यातून एक समाज निर्माण करतो, कारण तो समाजशील प्राणी आहे, पण आजच्या बिघडलेल्या किंवा अस्थिर अश्या सामाजिक परिस्थितीत माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे, किंवा त्यांच्या मनात एक प्रकारचा गोंधळ मुद्दाम काही ठराविक गटाकडून-समूहाकडून निर्माण करण्यात आलेला आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे.आपण सामाजिक कार्यात सहभाग नोंदवतो किंवा ते कार्य करायचा प्रयत्न करतो, तेंव्हा संघटना अत्यंत महत्वाची भूमिका बजावते, जगातल्या कोणत्याही समाजात संघटना ही अनन्य साधारण कार्य करण्यासाठी निर्माण होते, केली जाते...
दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी
Article

दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी

दारिद्र्याच्या घामाने शिजून 'वचपा' काढणारी कादंबरीबर्‍याच दिवसापासून आदरणीय मोतीरामजी राठोड सर, मला (डाॅ.वसंत भा.राठोड,किनवट) नांदेडला घरी बोलावत होते. तो योग आला १९ मार्च २०२५ रोजी कला महोत्सवाच्या निमित्ताने. संपूर्ण लेंगी मंडळच त्यांच्या घरी उतरविले. सोबत प्रा. डाॅ. राजीव राठोड होते. राठोड घराणे आणि चाळीतील सर्वांनीच गोबंजारा लेंगीनृत्याचा स्वानंद घेतला. सरांच्या अख्ख्या परिवारानेच आमचे सहर्षवदन स्वागत केले. याप्रसंगी मला त्यांचे आत्मचरित्र, आठवणीचं गाठोडं आणि वचपा ही कादंबरी भेट दिली. मी संपूर्ण कादंबरी वाचली आहे. अतिशय वाचनीय व तेवढीच संवेदनशील आहे. अतिशय जबाबदारीने राठोड सरांनी शब्दछटा वापरल्या आहेत.            वाङ्मयाच्या क्षेत्रात ग्रामीण, नागरी, आदिवासी, दलित, कामगार, महिला, बाल इत्यादी वाङ्मयीन साहित्य पूर्वीपासूनच नावारूपास आलेले आहेत. नव्वद...
भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा
Article

भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा

भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा१ एप्रिल, १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ नुसार झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने रचना आणि दृष्टिकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या " दि प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोलुशन " या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. ह्या बँकेची संस्थापना १९२६ च्या रॉयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये आणि भूमिका भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोठी भूमिका बजावतात. तिच्या काही भूमिकांमध्ये नोटांच्या समस्यांचे नियमन करणे, आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आणि देशाचे चलन आणि त्याची पत व्यवस्था चालवणे समाविष्ट आहे.भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाच्या वित्तीय व्यवस्थेचा कणा आहे. जनतेने आणि सरकारने बाजारात पैशाच्या प्रवाहाचे नियंत्रण, देखरेख आणि प्रोत्साहन देण्याची जबाब...