वेळीच ओळखा फॅटी लीव्हरचा धोका..!
यकृत हा शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक.. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक बाजूला काढून विषारी द्रव्यं तसंच अन्य घटक बाहेर टाकण्याचं काम यकृत करत असतं. निरोगी यकृत ही कृती अव्याहतपणे करत असतं. मात्र यकृताभोवती चरबी साठू लागल्यास त्याच्या कामात अडथळे येऊ लागतात. यकृतात साठलेल्या अतिरिक्त चरबीमुळे उद्भवणार्?या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत हेपॅटिक स्टिटोसिस असं म्हटलं जातं. हेपॅटिक स्टिटोसिस म्हणजेच फॅटी लिव्हर. या फॅटी लिव्हरचे अनेक दुष्परिणाम आहेत. चरबी साठू लागल्यानंतर यकृताचा दाह, यकृताच्या कार्यात अडथळे आल्यामुळे विषारी घटक शरीरात साठून राहण्यासारख्या समस्या निर्माण होतात. या व्याधीने गंभीर स्वरुप धारण केल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता असते. म्हणूनच या आजाराची लक्षणं वेळीच ओळखून त्या दृष्टीने उपाययोजना करणं आवश्यक आहे.या व्याधीचे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे...