📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

तिवसा येथे पुरस्कार वितरण समारंभ व 21 आंबेडकरी गायकांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

On: May 15, 2026 1:12 PM
आम्हाला फॉलो करा:
तिवसा येथील पुरस्कार वितरण समारंभ व 21 आंबेडकरी गायकांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे पोस्टर
तिवसा येथील पुरस्कार वितरण समारंभ व 21 आंबेडकरी गायकांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे पोस्टर


गौरव प्रकाशन तिवसा प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांचे स्मृतिदिनाचे निमित्ताने प्रकाशदीप बहुउद्देशीय संस्था वरखेडचे वतीने शुक्रवार दिनांक 15 मे रोजी तिवसा येथील महालक्षी सभागृह येथे पुरस्कार वितरण समारंभ तथा सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा निमंत्रक सागर भवते यांनी दिली आहे.


शुक्रवार दिनांक 15 मे रोजी महालक्ष्मी सभागृह तिवसा येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित पुरस्कार वितरण समारंभ तथा सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक सुदाम सोनुले राहणार असून समारंभाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर करणार आहे. उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार मयूर कळसे, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, साहित्यिक इब्राहिम खान उपस्थित राहणार आहे.

संस्थेचे वतीने विशेष पुरस्कारार्थी म्हणून भारतीय बौद्ध महासभाचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार, साहित्यिक सुषमा पाखरे, साहित्यिक रवी दलाल, प्रसिद्ध गायक आकाशराजा गोसावी, गायक संविधान मनोहरे यांना गौरविण्यात येणार असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे भंते अभयनायक, उद्योजक रोहित धोंगडे, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, नायब तहसीलदार आशिष नागरे, डॉ. रवींद्र मुंद्रे, विस्तार अधिकारी राहुल कांबळे, इंजिनिअर अतुल रामटेके, डॉ. तलमले, प्रा. दीपक धुरंधर, डॉ. सपना केने, गायक किशोर सरदार, ॲड. किरण यावले, सामाजिक कार्यकर्ते गजानन रामटेके, पत्रकार प्रशांत कांबळे, ग्रामसेवक सुनील मोंढे, विजय भिसे यांची विशेष गौरव पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे.


सदर समारंभ प्रसंगी तिवसा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, धम्मसेवक, कलावंत, यांचा विशेष सत्कार मान्यवरांचे हस्ते होणार असून सोबतच अमरावती जिल्ह्यातील 21 आंबेडकरी गायकांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये गायक मिलिंद खाकसे, शुभम खडसे, मुन्नाभाऊ धानके, सुरेश लोहे, राजेंद्र गाडगे, अनंत थूल, दिनेश भोमकाळे, जितेंद्र मोटघरे, मोहन इंगोले, सुनील आसोडे, विलास सोनाने, निलेश पारवे, विनोद वैद्य, पुंडलिक नागदेवते, शिलन गडलिंग, जितू गडलिंग, सचिन मनोहरे, राहुल गवई, कैलास दूधे,विनायक नागदेवते, तेजस तायवाडे सह आदी गायक उपस्थित राहणार आहे.

सदर समारंभाला तिवसा शहर व तालुक्यातील सर्व जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा निमंत्रक सागर भवते यांनी केले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!