बैठय़ा कामाचं वाढतं प्रमाण, व्यायामाचा अभाव तसंच आहारातील बदल या प्रमुख कारणांमुळे अलिकडेस्थूलतेची समस्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. खरं तर स्थूल असण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.
अनेक प्रकारचे कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रोल अशा अनेक विकारांचं मूळ स्थूलपणात आहे. भारताबद्दल बोलायचं तर सर्वच वयोगटात स्थूलतेचं प्रमाण वेगाने वाढतंय. जवळपास ३0 लाख भारतीय स्थूलतेने ग्रस्त आहेत. पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण दुपटीनं वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबत केलेल्या एका संशोधनात जगभरात दर वर्षी पाच लाख लोकांना स्थूलतेमुळे कॅन्सरची लागण होत असल्याचं आढळलं. या संशोधनात १८४ देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २0१५ मध्ये तीन लाख ४५ हजार महिलांना स्थूलतेमुळे कॅन्सर झाला. पुरूषांमध्ये हा आकडा एक लाख ३६ हजार इतका होता. महिलांमध्ये रजोनवृत्तीनंतर होणारा स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय आणि मोठय़ा आतड्याचा कॅन्सर तर पुरूषांमध्ये किडनी आणि मोठय़ा आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं. १९८0 नंतर जगात प्रौढांमध्ये स्थूलतेचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. म्हणूनच याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या