📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावतीत १७ मे रोजी चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन | गझल मुशायरा व कवीसंमेलन

On: May 14, 2026 6:41 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावती येथे आयोजित चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे पोस्टर व मान्यवरांची उपस्थिती
अमरावती येथे आयोजित चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे पोस्टर व मान्यवरांची उपस्थिती

अमरावती : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृतिदिन, क्रांतिवीर सुखदेवराव तिडके स्मृतिदिन आणि सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृतिदिनानिमित्त शब्दास्त्र विचार मंच व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ मे २०२६ रोजी चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून साहित्य, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.

संमेलनाध्यक्ष म्हणून आंबेडकरी अभ्यासक प्रा. डॉ. अनंता सूर उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून आंबेडकरी साहित्यिका सुषमा पाखरे भूमिका मांडतील. स्वागताध्यक्षपद माजी प्राचार्य डॉ. गोपीचंद मेश्राम भूषवणार आहेत. यावेळी प्रा. मुकुंद भारसाकळे, प्रा. डॉ. वसंत शेंडे,प्रा. डॉ. भास्कर पाटील, प्रा. डॉ. रविकांत महिंदकर, प्रा. अरुण बुंदेले आणि डॉ. विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संमेलनात विविध सत्रांद्वारे साहित्यिक आणि सामाजिक विषयांवर विचारमंथन होणार आहे. उद्घाटन सत्रानंतर ज्येष्ठ गझलकार सुदाम सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले असून विनय मिरासे, दीपाली सुशांत, अतुलकुमार ढोणे, सुनीता मेश्राम, संघमित्रा खंडारे, प्रवीण कांबळे, गिरीश खोब्रागडे, अविनाश गोंडाणे आणि अब्दुल समद रजा यांसारखे गझलकार सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय निवेदक पवन डोंगरे कार्यक्रमाचे संचालन करणार आहेत.

तिसऱ्या सत्रात “भारतीय लोकशाही आणि वर्तमान स्थिती” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. कुंदाताई सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात प्रा. सीमाताई मेश्राम, प्रा. डॉ. रजनी गेडाम, प्रा. दीपाली पडोळे आणि प्रतिभा प्रधान सहभागी होऊन समकालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीवर आपली मते मांडणार आहेत.

संमेलनाच्या चौथ्या सत्रात परिवर्तनवादी आंबेडकरी कवीसंमेलन रंगणार आहे. प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवीसंमेलनात शीला भास्कर पाटील, शिवा प्रधान, सुजाता पुरी, प्रा. देवानंद पाटील, विशाल मोहोड, हर्षवर्धन तायडे, सारिका वणवे, पूर्वा निजामशाही, मयुर गायकवाड यांच्यासह अनेक कवी सहभागी होणार आहेत.

समारोप सत्र डॉ. गोपीचंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून प्रा. डॉ. वसंत शेंडे, प्रा. अरुण बुंदेले, टी. एफ. दहीवाडे आणि दिलीप घरडे उपस्थित राहतील. साहित्य, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनवादी विचारांची सांगड घालणाऱ्या या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!