Sunday, October 26

Tag: Article

मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!
Article

मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!

मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!   आपण कुणाला मदत करीत असतो. कशासाठी तर आपण कोणाचे तरी देणे लागतो. म्हणूनच आपण कुणाला मदत करीत असतो  उपकाराची भाषा करीत असतो. काही लोकं मात्र स्वार्थी असतात. ते कोणाकडून मदत तर घेतात. परंतु इतरांना मदत करतांना ते कोणत्याच स्वरुपाची मदत करीत नाहीत. ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांनाही मदत करीत नाहीत.   मदतीबाबत सांगायचं झाल्यास आपल्याला ज्या विधात्यानं जन्म दिलाय ना. त्या विधात्यानंच आपल्याला इतरांना मदत करण्यासाठी पाठवले आहे. आपला जन्म जेव्हा होतो, तेव्हा आपण आपल्या मुठ्ठी बांधून येतो. ते मुठ्ठी बांधून आपला जन्म होण्याचं कारण काय? असा विचार कोणी केल्यास त्याचं कारण आहे की मी सर्वकाही या मुठ्ठीत जगाला वा सृष्टीला काही देण्यासाठी आलोय हे जगाला सांगणं आणि जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण बंद मुठ्ठी करुन जात नाही. तेव्हा आपले हात हे पसरत असतात. याचाच अर्थ ...
डालड्याचा डब्बा..!
Article

डालड्याचा डब्बा..!

डालड्याचा डब्बा..! दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा  डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र......! एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा  छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल  मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची....! डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं  पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी...
सोशल मीडियाचा राक्षस.!
Article

सोशल मीडियाचा राक्षस.!

सोशल मीडियाचा राक्षस.!झोपायची वेळ झाली म्हणून फेसबुक बंद करून रमाने फोन बाजूला ठेवायची वेळ झाली आणि तितक्यात तिला फेसबुक वर एक मेसेज आला.तो मेसेज तिच्या बरोबर कॉलेजात शिकायला असणाऱ्या एका मित्राचा होता.तशी रमाच्या विवाहाला बरीच वर्ष झाली होती आणि तिची मुले ही विशीची होती.पण फक्त कॉलेज मध्ये सोबत असल्यामुळे त्या मित्राची व तिची ओळख आज ही होती.त्याचा मेसेज होता कि मला तुझ्या इतकी जवळची मैत्रीण कुणीच नाही ग.मेसेज वाचून रमा दचकली आणि आधी तिने आजूबाजूला पाहिले कि नवरा तर आसपास नाहीना.तिने सर्व प्रथम तो मेसेज डिलिट केला.कारण या मित्राचा फ्लरटिंग करण्याचा खरा स्वभाव तिला माहीत होता.तिच्या मनात त्याच्या विषयी काहीच आकर्षण नव्हतं.पण हाच मेसेज जर चुकून तिच्या नवऱ्याने वाचला असता तर तिच्या सुखी संसारात संशय नावाच्या राक्षसाचा प्रवेश कधी झाला असता हे त्या कुटुंबाला कळलेही नसते.कारण असं म्हणतात कि ...
बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो ‘आभाळमाया’ झाला.!
Article

बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो ‘आभाळमाया’ झाला.!

बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो 'आभाळमाया' झाला.!   वडिलांच्या अनेक गोष्टींचा राग यायचा.  आता 'त्या'च गोष्टी मी अगदी तितक्याच सहजतेने करतो! मग त्या काळातल्या संतापाची आठवण झाली की अपराधीपणाची भावना दाटून येते. आईच्या मायेचे गोडवे आयुष्यभर गायलेत मात्र वडिलांच्या मायेचे काय झाले? याचे उत्तर आता अलगद गवसते आहे.   जन्मभर आईची माया तिच्या कुशीत शिरून अनुभवलेली पण बाप मात्र घाबरूनच अनुभवलेला. धाक, दरारा, दडपण यात बाप विरत गेलेला आणि मी ही त्याच प्रतिमेत गुरफटत गेलेलो. खरं तर, आता कळतं की वडिलांची माया देखील आईसारखीच स्नेहार्द्र होती,  त्यातही कोमलता होती पण पाकळ्यात अडकलेला भुंगा जसा कोषात गुरफटून जातो तसं वडिलांचं झालेलं असतं.   गरजांच्या चौकटीत त्यांना कुटुंबव्यवस्थेनं असं काही चिणलंय की त्यांची दुसरी तसबीरच समोर येत नाही. गरजा पूर्ण करणारा निष्ठूर माणूस असं काहीसं भकास चित्र उभं ...
आली बघा तुमची..!
Article

आली बघा तुमची..!

आली बघा तुमची...! ( काय असेल नक्की)       ...साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महीन्यात व्यायाम करणाऱ्याची संख्या खूपच जास्त दिसते.. ऋतु नुसार व्यायाम करणारे खुप आहेत.. काही जण काही जणाना पहायला म्हणुन व्यायामाला येतात.. मी मात्र आवडीने व्यायाम करते आणि न चुकता करते.. थंडी कमी झाली की व्यायामाला गळती लागते ... आज रंगींग ला ग्राउंडवर निघाले तर शेजारुन बोलल्याचा आवाज आला. गोड काकु काकाना म्हणत होत्या आली तुमची... ( ) या कंसात म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय काय विशेषणं आली माहीत नाही.. मी त्यांच्या कडे पाहुन हसले तर काकु जरा गुस्यातच दिसल्या.आजूबाजूला फार कोणी दिसलं नसल्याने त्या मलाच म्हणाल्या हे लक्षात आलं.. काकु शाल पांघरून ग्राउंड कडे निघाल्या  होत्या.. त्यांना पाहिल्यावर मला वाटलं, मी स्लीव्हलेस घालुन आहे आणि यांना थंडी कशी काय वाजतेय..??..         मी गेटमधुन आत गेले आणि रनींग ला सुरुव...
गाव कुठे हरवलं माझं?
Article

गाव कुठे हरवलं माझं?

गाव कुठे हरवलं माझं?   गावात एक वटवृक्षाचे बुलंद झाड होते.त्याला चहूबाजूंनी समांतर करून घेणारा एक कट्टा होता.जणू तो म्हणजे गावकऱ्यांसाठी मैत्रीचा कट्टा होता.गावातील पांढऱ्या टोपीची व केसांची म्हातारी माणसे गावची शोभा होती.दिवसभर घडलेल्या घडामोडी ते चर्चा करत कट्ट्यावर बसायचे आणि आपली मते व अनुभवे मांडायचे.यांत शंकर आप्पा त्या सगळ्याचे  प्रमुख होते . त्यांचा अनुभव भला मोठा होता. काय करावे ? काय करू नये? यावर त्यांचे बारकाईने निरीक्षण होते. त्यांची पत्नी प्रभावती बाई त्यांना प्रेमाने आम्ही सगळेच मोठी आई म्हणत असत. पोरी बायकांना उठता बसता अनुभवाचे ज्ञानामृत ज्ञानामृत देत असत. शेतकरी असल्यामुळे रानमेवा मात्र  पोट भरून खायला मिळायचा.  त्यात पेरू, बोर, मोसंबी, हरभरा, पालेभाज्या याचा समावेश असत.आप्पा दररोज येताना आपल्याबरोबर काही ना काही आपल्या सोबत घेऊन यायचे आणि तो रानमेवा आपल्या नातवंडांना आणि...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
Article

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज    महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय चिंतनाचा व चिंतन करणारा विषय आहे. नैसर्गिक आपत्ती नापिकी सावकारांचे आणि बँकांचे कर्ज वसुलीसाठी तगादा मुलीचे लग्न आजारपण यास अन्य कारणांमुळे शेतकरी   आत्महत्या करत आहे. शासन कितीही दवा करीत असले तरी शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सतत सुरूच आहे. सन २००१ ते आतापर्यंत तब्बल १९,७११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.   राष्ट्रीय गुन्हे शाखेच्या अहवालानुसार २०२१ मध्ये देशात एकूण १० हजार ८८१ शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी राज्यात २६४९ शेतकरी आणि १४२४ शेतमजुरांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात २१३८ शेतकरी आत्महत्या झाल्या. सर्वाधिक १०७७ आत्महत्या या विद...
सावड ; ग्रामीण भागात रुजलेला खरा सहकार.!
Article

सावड ; ग्रामीण भागात रुजलेला खरा सहकार.!

सावड ; ग्रामीण भागात रुजलेला खरा सहकार.!                     "सहकार खर तर महाराष्ट्राने देशाला दिलेला सर्वात मोठा मूलमंत्र" खर तर हा सहकार महाराष्ट्र आणि त्यात असणाऱ्या प्रत्येक गावा-गावात रुजलेला आहे. हे ज्यावेळी आपण ग्रामीण भाग फिरतो त्यावेळी लगेच आपल्या  लक्षात येत. सहकार ह्या मातीत नेमका कश्या मूळे रुजला हेही समजून येत. जास्त खोलात आणि राजकीय भानगडीत न पडता आपण आपल्या "सावडी" वर बोललेलं कधीही उत्तम राहील नाही का ..?             आता ही  सावड म्हणजे नेमकं काय? आणि तो शब्दही नेमका कुठून आणि कसा आला असेल, हा विचार ज्यावेळी मनात डोकावतो त्यावेळी त्याच उत्तरही लगेच भेटत. पहिलं सावड म्हणजे नेमकं काय ?  हे जाणुन घेऊ. ग्रामीण भागात  शेतीची काम सुरू झाली की मग सुरू होते "सावड", ज्याला कामाची आवड असते ना ती व्यक्ती नक्कीच सावड करत असते बर का..!   सावड म्हणजे नेमकं काय ?  तर त्याच उत्तर म्हणजे  आप...
प्रिय सखी…!
Article

प्रिय सखी…!

प्रिय सखी..    तुला विटाळ म्हणुन हिणवणाऱ्याच्या पाच दहा द्याव्या वाटतात.. मी तुझ्याशी रोजच बोलते.. तुझ्यावर पुस्तकात लिहीलय.. तुझ्यावर अनेकदा व्हीडीओतुन बोललेय.अनेकदा लेखातुन व्यक्त झालेय..   मुळची मी कोकणातील असल्याने ४ दिवस बाहेर बसायला लागायचं त्यामागे काय कारणं होती माहीत नाही पण स्त्रीला विश्रांती मिळावं हे कारण जरी धरलं तरीही आम्हाला शेतात काम करायला लागायचं त्यामुळे विश्रांती नाहीच पण लहानपणापासून शेतात काम केल्याने शरीराला कामाची आणि व्यायामाची लागलेली सवय आजही तशीच आहे त्यामुळेच तुही सखी न चुकता २७ व्या दिवशी येतेस..   जग इकडचं तिकडे होइल पण तुझी वेळ तु चुकवत नाहीस.. तु माझी प्रिय सखी आहेस आणि मी शरीरावर , खाण्यावर ,वेळा पाळण्यावर झोपण्यावर कुठलेही  अत्याचार होवु देत नाही.. मला मी लावुन घेतलेली शिस्त आहे म्हणुन तुही दरमहिन्याला न चुकता तुझ्या वेळेत मला कुठलाही त्रास न देता मला भेट...
…. शास्त्र जाणुन घ्या.!
Article

…. शास्त्र जाणुन घ्या.!

.... शास्त्र जाणुन घ्या..!      प्रत्येक माणूस आपल्याला सोयीनुसार जात , धर्म आणि त्यानुसार येणारी कर्मकांड यात अडकलेला आहे त्यामुळे जातीधर्माच्या विळख्यात आरक्षणापासून ते जातीचा गर्व या सगळ्याच पापात दिवसेंदिवस गुंतत चाललाय.. मी अमुक एक जातीचा आहे यापेक्षा इथुन पुढे मी माणूस आहे हे सांगायला सुरुवात करायला हवी... आता महाराष्ट्रात चालु असलेलं राजकारण यात तरुण मुलानी लक्ष न घालता शास्त्र जाणुन घेण्यात त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करावा आणि पालकानी जर भगवद्गीता अध्याय ४ श्लोक १३ पान नं. १८१ . 182 वाचला किवा जाणुन घेतलं तर एका क्षणात जाणवेल कोणाच्या तरी सांगण्यावरुन आपण किती वाईट वागतोय किवा वाईट विचार करतोय.. भगवंताने  फक्त चार वर्णात संपूर्ण मानवजात वसवली असताना आपण कोण हे वाईट राजकारण खेळणारे ??.. तो उच्च तो नीच हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला दिला कोणी ??.. माझी सगळ्याना विनंती आहे की दिवाळीच्या ...