Monday, October 27

Tag: Article

संत गाडगेबाबा : एक चालते बोलते संस्कार पीठ
Article

संत गाडगेबाबा : एक चालते बोलते संस्कार पीठ

Sant Gadgebaba : संत गाडगेबाबा :- एक चालते बोलते संस्कार पीठ ---------------------------------------- अशिक्षितपणामुळे समाजाची काय हानी होते. हे अगदी जवळून पाहिल्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहचावी यासाठी एका अडाणी असलेल्या अवलियाने अफाट प्रयत्न करून शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे समाजाला पटवून दिले. आणि ते विद्वान म्हणजे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा होय. गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजजी जानोरकर होते. गाडगे बाबाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील व्यसनाने ग्रासलेले होते. व्यसनामुळे आपल्या परिवारावर सुद्धा त्यांचे दुर्लक्ष होते ,त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था होती. आणि बालवयात गाडगे बाबा आपल्या घरची ही सर्व परिस्थिती पहात होते. आपले वडील अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांना व्यसन...
कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी  व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा ‘बिब्बा’
Article

कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा ‘बिब्बा’

कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा 'बिब्बा'------------------------------------"किती बांधू मी पडाय खांडकाले काळ्या बिब्ब्याचं रोग निदान ज्यानं केलं तो वैद आजारी होता ! " 'बिबा' हे औषधी गुणयुक्त व त्याचे फुल आणि गोळंबी खाण्यासाठी उपयोगात पडणारे जंगली फळ आहे. हा एक प्रकारचा रानमेवा आहे. पण या फळाचा काळ्या रंगाचा भाग (बिबा) हा गावाकडील कष्टकरी, शेतकरी लोक तळपायाला जर काटा रुतला, काडी रुतली, कापलं तर त्या जखमेवर जाळावर गरम करून त्याच्या तेलाचा चरका (चटका किंवा डागणी) देतात. बिब्याचं पडयही बांधतात. त्यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते व वेदनाही कमी होते. कवी विजय ढाले हा शेतकरी, कष्टकरी आहे. त्याला याचा वापर कसा व कुठे करायचा ? याचे ज्ञान आहे. आणि म्हणूनच त्याने कवितासंग्रहाचे शिर्षक बिब्बा असे वापरले असावे. तो त्याकडे प्रतीक म्हणून बघत असावा. पुर्वीपासून ये...
पाहुया पेडगावचे शहाणे..!
Article

पाहुया पेडगावचे शहाणे..!

पाहुया पेडगावचे शहाणेबऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठलले गाव का नाही ? पाहुया तर मग :६ जून १६७४,ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण : अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की ...
पारावरच्या गप्पा….!
Article

पारावरच्या गप्पा….!

पारावरच्या गप्पा....!अय.....चेरमन आर कुड चालला ! तू तर मोकार बाता मारीत व्हता. आपला लै वट, खासदार ,मंत्री आन आमदार साह्यबा जवळ. ! मस  सारी दुन्या येऊन गेली की गावात कुड गेली मदत .ती पन तात्काळ की फात्काळ  येणार व्हती नव्ह . आता त ,थेट नागपुरात हाय हिवाळी अधिवेशनात  समद मंत्री संत्री, आन आमदार ! तिथं काय ठरलं का ? तुला फोन केला असलं की  तुह्या  ..साह्यबानि.. रामभाऊ थोडा हसला आणि म्हणाला अस पण तुमची इज्जत काय त्य माहीत हाय.जवळून जाणाऱ्या कुत्र्याला जोरदार हाड, आर हाड....! अस म्हणत त्याने विषय बदला आणि पुन्हा बोलू लागला. नाय तरी तिथं जाऊन तरी काय करत्यात म्हणा .सरकारी खर्च उगाच यर्थ अशी गत हाय भो नागपूर अधिवेशनात नाय का चेरमन!चेरमन हसला,आणि बोलू लागला. गारपीट झाली त्या येळी तुह्या थोबाडाव" गार  का नाय पडली भली मोठी. .? गप्प.. तरी राहिला असता. सारखी वलवाल लावली गावभर . इरोधी पार्टी नि खर्च...
फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!
Article

फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!

फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!   लिंबाचा वापर सर्वांच्याच घरी केला जातो. (Kitchen Hacks) वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबू एसिडीक असतो म्हणूनच लिंबू योग्य तापमानात स्टोअर करावे लागतात. अन्यथा लिंबू लवकर खराब होण्याची शक्यता असते.   लिंबांची शेल्फ लाईफ खूपच कमी असते म्हणूनच ते लवकर सुकतात. (Food Hacks) लिंबू स्टोअर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फ्रिजमध्ये लिंबू ठेवल्यानंतर ते काही दिवसांनी सुकतात किंवा काळे पडतात. लिंबू महिनोंमहिने ताजे रहावेत यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.   * लिंबू पाण्यात घालून ठेवा : लिंबू जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात ठेवा. सगळे लिंबू पाण्याने भरलेल्या जारमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून अनेक दिवस लिंबू ताजे आणि रसाळ राहतील.   * लिंबू कलिंगड आणि सफरचंदाबरेबर ठेव...
पोतराज…
Article

पोतराज…

पोतराजपोतराज हा मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक. तो जातीने महार वा बहुधा मातंग असतो. पोतराज हा शब्द म्हणजे पोत्तुराजु या तमिळ शब्दाचे रूपांतर होय. शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेत सात बहिणी या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्धआहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला पोत्तुराजु म्हणतात. मरीआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला मरीआईवाला व लक्ष्मीआईवाला अशीही नावे आहेत.पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा कडकलक्ष्मी आली असे म्हटले जाते. मरीआई ही कडक देवी असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी म्हणतात. पोतराजाच्या हातातील कोरड्याला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी हे नाव मिळाले, असे सरोजिनी बाबर यांचे मत आहे. लक्ष्मी हा शब्द येथे विष्णुपत्नी या अर्थाने आलेला नसून, अंबाबाई या अर्थाने आला आहे.पोतराज पुरुष असूनही तो...
मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?
Article

मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?

मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था ३ ते ४ तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो.स्नायूंमध्ये मायोसीन आणि ॲक्टिन नावाचे तंतू असतात, त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व ॲक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅर्टीस असे म्हणतात.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर २ ते ३ तासांनी सुरू ह...
कुंभारकामाचा झाला असा प्रवास…
Article

कुंभारकामाचा झाला असा प्रवास…

कुंभारकामाचा झाला असा प्रवास...पाषाणांतुन जी संस्कृती उगवली तिला अश्मयुग असे म्हटले जाते. दगडाची हत्यारे, तासण्या, टोचण्या ते रंगीबेरंगी दगड-गारगोट्यांचे अलंकार या काळात बनवले जात होते. या काळात माणूस शिकारी व पशुपालक अवस्थेत होता. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना कल्पकतेने आणि कष्टाने जीवनोपयोगी बनवण्याची कला ही मानवी बुद्धीची एक झेपच होती. पण याच काळात माणूस केवळ पत्थर नव्हे तर मातीचाही कल्पकतेने उपयोग करायला शिकला. त्या कलेलाच आपण कुंभारकाम म्हणतो. आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी खापरे.भारतात या कलेची सुरुवात तीस हजार वर्षांपुर्वी झाली. सिंधुपुर्व कालापासुनचे कुंभारकामाचे नमुने आपलयाला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पीके याचीही माहिती मिळते. कुंभारकामाचा प्रवास हाताने घडवलेली मडकी व वस्तुंपास...
शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक?
Article

शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक?

शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक? सध्या सगळीकडे थंडीचे दिवस सुरु आहेत. या कडाक्याच्या थंडी पासून वाचण्यासाठी लोक गरम पाणी पीत पितात. थंडीचा त्रास कमी होण्यासाठी काही लोक नियमित गरम पाणी पितात. खरंतर, गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते, पण अनेकदा थंडीत फार गरम पाण्याचे सेवन केले जाते. त्यामुळे शरीरावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. एवढेच नाही तर शरीरात इतरही अनेक समस्या सुरू होतात.*अन्ननलिकेचे नुकसान होते गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सर्वाधिक परिणाम होतो. तोंड आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका आहे. गरम पाणी प्यायल्याने या अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. यासोबतच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना दीर्घकाळ असते.*हार्ड स्टूल गरम पाणी प्यायल्याने तुमच्या लक्षात आले असेल की स्टूल कठीण होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. जेव्हा तुम्ही खूप गरम पाणी प्याल तर ते पोट ग...
 मोबाईलचे तंत्रज्ञान शाप की वरदान ?
Article

 मोबाईलचे तंत्रज्ञान शाप की वरदान ?

 मोबाईलचे तंत्रज्ञान शाप की वरदान ?आजच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईल पहावयास मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे. अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधी कधी मोबाईल नकोस वाटू लागतो. त्यातूनच प्रश्न निर्माण होतो, मोबाईल शाप कि वरदान?पण, ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते. मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे असतो. मोबाईल सुद्धा एक विकसित स्वरुपाचे तंत्रज्ञान आहे, ते शाप कसे असेल? ते एक फार मोठे वरदानच आहे. फक्त मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जातो, त...