📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक?

On: September 23, 2025 1:40 PM
आम्हाला फॉलो करा:
शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक? 
सध्या सगळीकडे थंडीचे दिवस सुरु आहेत. या कडाक्याच्या थंडी पासून वाचण्यासाठी लोक गरम पाणी पीत पितात. थंडीचा त्रास कमी होण्यासाठी काही लोक नियमित गरम पाणी पितात. खरंतर, गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते, पण अनेकदा थंडीत फार गरम पाण्याचे सेवन केले जाते. त्यामुळे शरीरावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. एवढेच नाही तर शरीरात इतरही अनेक समस्या सुरू होतात.
*अन्ननलिकेचे नुकसान होते
गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सर्वाधिक परिणाम होतो. तोंड आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका आहे. गरम पाणी प्यायल्याने या अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. यासोबतच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना दीर्घकाळ असते.
*हार्ड स्टूल
गरम पाणी प्यायल्याने तुमच्या लक्षात आले असेल की स्टूल कठीण होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. जेव्हा तुम्ही खूप गरम पाणी प्याल तर ते पोट गरम करते. यामुळे मल कडक होते. याशिवाय यामुळे मूळव्याधाची समस्या उद्भवू शकते.
* शरीरात पाण्याची कमतरता
यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. तुमचे ओठही कोरडे होऊ शकतात आणि पाय दुखू शकतात.
* पोट खराब होते
कोमट पाणी तुमच्या पचनसंस्थेसाठी चांगले असते, पण जर तुम्ही जास्त गरम पाणी प्यायलात तर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पोटाची पचनक्रियाही बिघडू शकते.
*गरम पाणी किती प्यावे
दिवसातून फक्त तीन ग्लास कोमट असलेले पाणी प्या. जेव्हा तुम्ही गरम पाणी प्याल तेव्हा ते जेवण झाल्यावर प्या. याने तुमचे वजनही नियंत्रणात राहील, तुम्ही निरोगी राहाल आणि तुमच्या पोटासाठीही चांगले आहे.
संकलन : मिलिंद पंडित,
कल्याण
*सौजन्य : ABP माझा*

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment