पारावरच्या गप्पा….!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
पारावरच्या गप्पा….!
अय…..चेरमन आर कुड चालला ! तू तर मोकार बाता मारीत व्हता. आपला लै वट, खासदार ,मंत्री आन आमदार साह्यबा जवळ. ! मस  सारी दुन्या येऊन गेली की गावात कुड गेली मदत .ती पन तात्काळ की फात्काळ  येणार व्हती नव्ह . आता त ,थेट नागपुरात हाय हिवाळी अधिवेशनात  समद मंत्री संत्री, आन आमदार ! तिथं काय ठरलं का ? तुला फोन केला असलं की  तुह्या  ..साह्यबानि.. रामभाऊ थोडा हसला आणि म्हणाला अस पण तुमची इज्जत काय त्य माहीत हाय.जवळून जाणाऱ्या कुत्र्याला जोरदार हाड, आर हाड….! अस म्हणत त्याने विषय बदला आणि पुन्हा बोलू लागला. नाय तरी तिथं जाऊन तरी काय करत्यात म्हणा .सरकारी खर्च उगाच यर्थ अशी गत हाय भो नागपूर अधिवेशनात नाय का चेरमन!
चेरमन हसला,आणि बोलू लागला. गारपीट झाली त्या येळी तुह्या थोबाडाव” गार  का नाय पडली भली मोठी. .? गप्प.. तरी राहिला असता. सारखी वलवाल लावली गावभर . इरोधी पार्टी नि खर्च केला कायनू रामभाऊ तुला! त्या मूळ तू ज्यादा बोलतोय.
आर चेरमन!  तुमच्या सारखी झेलकरी समद्या गावात हाय आन गावोगावी बी हाय, ह्या पुढार्यांची. त्या मूळ ती बेनी घाबरत नाय! त्यांची काय चूक र…!. काही बोलायला गेलो की कुत्र्या सारखी तुम्ही अंगाव धावून येता. पण ध्यानात ठिवा…! आर तुमच्या मधी, आन तुमच्या मंत्री खासदार ,आमदार यांच्यात लै रग” हाय तर बोला की त्या मोदी इरोधात.आर पार मातीत घातलं ना शेतकऱ्याला त्यानी  तरी  तुमच तुणतुणे चालू मोदी है तो मुंकीन है…का नाही फेकला राजीनामा …! त्याच्या थोबाडाव.  कांदा निर्यात बंदी इरोधात.
चेअरमन…!आर” इमान राखायचा तर काळ्या मातीशी , त्या मातीत राबणाऱ्या माणसांशी राखा. शेवटी ध्यानात ठेवा. ह्या मातीतून आला आन ह्याच मातीत जाणार . ह्य भान ठिवा…! गावात पाराव बसून तुम्ही तुमची ,आन तुमचा कोण असलं त्याची लाल करत बसा. पण ध्यान असू दे! हिसाब व्हतो बर का! निवडणुकीत समदा . आन तुम्हाला वाटत आसल तीन राज्य जिकली इथं तर सार, “साट लॉट हाय!तस नाय, इथूनच सुरुंग लागलं ध्यानात असू दे..! अस म्हणत यथेच्छ शिवी आसडत रामभाऊ ह्या व्यवस्थेवर ,अक्षरशः थुंकून बडबड करत निघून गेला…
अशोक पवार

Leave a comment