📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा

On: April 30, 2025 7:42 PM
आम्हाला फॉलो करा:
बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 25 एप्रिल 2025 जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मलेरिया विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मलेरिया हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, तसेच त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी लागते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी हिवताप प्रतिबंधासाठी “गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा” तसेच “क्लोरोकिनची गोळी, करी हिवतापाची होळी” अशी आकर्षक घोषवाक्य फलकांवर लावण्यात आली.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

यावर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाचे घोषवाक्य होते — “चला हिवताप संपवूया – पुनर्विचार करा, योगदान द्या, पुन्हा सक्रिय व्हा.”

कार्यक्रमाच्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके मॅडम, आरोग्य सहाय्यक श्री. शेळके, आरोग्य सेवक श्री. चरपे, खडसे, भोपळे, काकडे, आरोग्य सेविका सौ. चिडे, आरोग्य सहाय्यिका सौ. चव्हाण, औषध निर्माण अधिकारी काकडे मॅडम व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी हिवताप निर्मूलनासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये मलेरिया विषयी जागरूकता निर्माण झाली असून, आरोग्य केंद्राचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

दारव्हा येथे विदर्भ मंडल यात्रेचे स्वागत करताना काँग्रेस पदाधिकारी व ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम

दारव्ह्यात विदर्भ मंडल यात्रेचे जल्लोषात स्वागत; ओबीसी जातीनिहाय जनगणनेच्या मागणीला काँग्रेसचा ठाम पाठिंबा

LPG सिलेंडरवर नवीन कर लागू होणार का? सरकारच्या प्रस्तावामुळे किंमत वाढण्याची शक्यता

LPG सिलेंडर महागणार? सरकार नव्या शुल्काच्या तयारीत असल्याची चर्चा; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

ग्रामीण वातावरणात आनंदाने नृत्य करणारे जोडपे – सोशल मीडियावर व्हायरल झालेला डान्स व्हिडिओ

ग्रामीण जोडप्याच्या साध्या डान्सने जिंकली लाखो मनं; सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा

छत्रपती संभाजीनगर येथे CJP बैठकीपूर्वी अभिजीत दिपके माध्यमांशी संवाद साधताना

CJP ची आज निर्णायक बैठक; अभिजीत दिपके म्हणाले – ‘राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण…’

₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क लागू होणार? UPI Charges News Marathi 2026

UPI वर शुल्क लागू होणार? ₹2,000 पेक्षा जास्त ऑनलाइन पेमेंटवर चार्जचा प्रस्ताव; सरकारने दिले महत्त्वाचे संकेत

Leave a comment