📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

कामगार दिन: कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान

On: April 30, 2025 7:41 PM
आम्हाला फॉलो करा:
कामगार दिन : कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान

कामगार दिन : कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान

प्रत्येक वर्षी १ मे हा दिवस 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कामगारांसाठी विशेष मानला जातो, कारण याच दिवशी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला होता. ही केवळ सुट्टी नसून, ही आहे मेहनतीने जग चालवणाऱ्या श्रमिकांना सलाम करण्याची संधी.
१८८६ साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी ८ तासांच्या कामकाजासाठी मोठा लढा दिला. त्यावेळी अनेक कामगारांना दररोज १२ ते १६ तास काम करावे लागत होते, पण त्याचे योग्य वेतन मिळत नव्हते. या अन्यायाविरुद्ध हजारो कामगार रस्त्यावर उतरले. काहींना आपला जीव गमवावा लागला, पण त्यांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला ८ तासांची कामाची वेळ आणि इतर सोयी मिळाल्या. याच संघर्षाची आठवण म्हणून १ मे हा 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून ओळखला जातो.

● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
 भारतात पहिल्यांदा १ मे १९२३ साली मद्रास (आताचे चेन्नई) येथे 'कामगार दिन' साजरा करण्यात आला. आज भारतात लाखो कामगार विविध क्षेत्रांत आपल्या कष्टाने देशाची प्रगती घडवत आहेत. शेती, कारखाने, बांधकाम, सेवा क्षेत्र, वाहतूक, सफाई कामगार – असे असंख्य कामगार आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
आजही अनेक कामगारांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मोबदले मिळत नाहीत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना कुठलीही सुरक्षा मिळत नाही. महिला कामगारांना दुहेरी अन्यायाला सामोरे जावे लागते. स्थलांतरित कामगारांना वेळीच रोजगार, आरोग्य सुविधा किंवा निवारा मिळत नाही. त्यामुळे कामगार हक्कांसाठी अजूनही जागरूकता आणि धोरणात्मक उपाययोजना आवश्यक आहेत.
 आपण १ मे रोजी फक्त भाषणे करून किंवा पोस्टर लावून कामगार दिन साजरा करतो, पण खरी गरज आहे ती वर्षभर त्यांच्या हक्कांचा सन्मान करण्याची. कामगार वर्गाला केवळ मदतीची नाही, तर सन्मानाची गरज आहे. त्यांचे हक्क, सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी समाज म्हणून आपण पुढाकार घेतला पाहिजे.
 महिला कामगारांना अनेकदा कमी वेतन, असुरक्षित कामाची जागा, प्रसूती लाभांचा अभाव आणि लैंगिक छळ याला सामोरे जावे लागते. महिला कामगारांसाठी स्वतंत्र शौचालये, बालसंगोपन केंद्रे, सुरक्षितता यावर लक्ष देणे गरजेचे आहे. एकेकाळी बलशाली असलेल्या कामगार संघटना आज अनेक अडचणींना सामोऱ्या जात आहेत – राजकारण, फूट, आणि कामगारांचे कमी होणारे संघटीकरण. संघटनांना नव्या काळात कामगारांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घ्यावे लागेल.

कष्ट करणाऱ्याला केवळ दयेने नव्हे, तर सन्मानाने बघणे गरजेचे आहे.  कामगारांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे, हे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे झाले आहे. आपण जे खातो, वापरतो, उभे करतो – यामागे कुणाचा तरी घाम असतो. त्या घामाला ओलखून त्याचा आदर करणं, हीच कामगार दिनाची खरी भावना आहे. चला तर मग, या १ मे रोजी आपण ठरवू ‘कामगार हा फक्त एक “कर्मचारी” नाही, तो आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे.’

– बंडूकुमार धवणे,

संपादक गौरव प्रकाशन

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

1 thought on “कामगार दिन: कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान”

  1. खूप छान लिहीलयं कामगार हा आधीचा ख-या अर्थाने,मेहनत,मजदुरी कष्ट करीत घाम गाळीत होता. आतातरी ब-याच सुखसोयी, सुविधा उपलब्ध आहेत.

Leave a comment